नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

पर्यटकांचं आकर्षण – कॅपिलानो ब्रीज

निसर्गाच्या विविध चमत्काराबरोबरच कॅनडातील मानव निर्मित कलाकौशल्ये पाहून आम्ही भाराऊन गेलो. विज्ञानाची कास धरत मानवाने केलेले अदभुत चमत्कार थक्क करून सोडणारेच होते. कॅपिलानो ब्रीज हे त्यापैकीच एक ! कॅपिलानो ब्रीज म्हणजे मानवी कौशल्याचा अद्भुत चमत्कार असल्याची अनुभूती आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर झाली. मती गुंग करणारीच ही स्थापत्य कला आहे. तिथले दृश्य पाहून निसर्गाच्या किमयेचे नि त्यात भर घातलेल्या कृत्रिम कल्पकतेचे कौतुक वाटले. कॅपिलानो सस्पेंशन ब्रिज, ट्रीटॉप्स अँडव्हेंचर आणि रोमांचक नवीन क्लिफवॉक अशा तीन चित्तथरारक सौंदर्याने मन भारावून गेले. […]

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

राजकपूर ही खरंतर एक संस्थाच ! निर्विवाद अधिराज्य करणारी, पूर्णतेचा ध्यास घेणारी. कोठलीही तडजोड न करणारी. तो स्वतःच एक पांढरा रुपेरी पडदा होता – बाह्यतः सारं काही मिरविणारा, पण आतमध्ये कुठेतरी खोलवर एक धुमसत्या कलागुणांचा ज्वालामुखी घेऊन हिंडणारा ! “जोकर ” च्या नेमक्या अपयशापाशीच खरंतर राज कपूर संपला. हे मरण जिव्हारी बाळगत त्याने ” बॉबी “, ” सत्यम शिवम ” सारखी आपल्या पराभवाची थडगी बांधली. […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ३

गणिताचा प्रश्न पाहिल्यावर थिजल्यासारखे होते. काय करू काही सुचतच नाही!!! हा माझाच नव्हे,अनेकांचा अनुभव आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरू कुठे करावं हा प्रश्न असतो, तर तितक्याच विद्यार्थ्यांना समीकरण मांडणे अवघड जाते. म्हणून स्ट्रेटजी उपयोगी ठरते. त्यावरचा उपाय – ‘स्ट्रॅटजि’ – ‘रणनीती’. पहिले काय करावं हे सुचावं लागत नाही, माहित असते आणि ते केले के कोंडी फुटते … पुढची वाट दिसू लागते … […]

पुष्पा, आय ‘लव्ह’ टिअर्स !

आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट ! […]

राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी….

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मूळ स्वरुपाच्या विरोधात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी निवडणूक प्रक्रियेला दूषित करतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध सूचना दिल्या असूनही कोणताही राजकीय पक्ष त्याच्या वतीने गुन्हेगारी घटकांच्या उन्मुलनासाठी पाऊल उचलताना दिसत नाही. […]

हसण्यावारी नेऊ नका

आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्‍याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो. […]

‘देवबाभळी’- व्यक्त /अव्यक्ताचा झगडा !

फक्त दोन (दृश्य स्वरूपातील ) स्त्री – पात्रांनी सशक्तपणे पेललेलं, अलीकडच्या काळातील संगीत नाटक म्हणजे – देवबाभळी ! त्या दोघींचे “अहो “होतेच पार्श्वभूमीला, पण दिसत नव्हते. एकतर ऐकूही येत नव्हता. पण त्या दोघांचेही अस्तित्व नाटकाला पुरुन उरले होते. […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – २

गणितावर आधारित शैक्षणिक-ललित साहित्य फार कमी बघायला मिळते. अशा साहित्यात आधुनिक संकल्पना आल्या तर बरे होईल असं वाटते. मुलांना आकर्षित करता येईल, हे अवघड नाही – इंट्रेस्टिंग आहे, उपयोगी आहे असे सांगता येईल. एक मार्ग दिसला तो मांडून पाहतो आहे. आपला प्रतिसाद प्रार्थनीय. […]

न जाणलेले भगतसिंह….

२३ मार्च १९३१ हा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.. ज्या ऐतिहासिक दिवशी भगत सिंह ,सुखदेव आणि राजगुरु हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. त्या काळी कितीतरी जवान वीरांनी क्रांतिकारी होण्याचा निर्णय घेऊन कायमचा घराला राम राम केला असणार आणि त्याची दखलही आपल्या इतिहासाने घेतली नसेल. […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १

ना मी शिक्षक आहे ना गणित तज्ञ ना कथाकार. मी इन्स्ट्रक्शनल डिझायनर – इ लर्निंग कोर्सेसचे स्क्रिप्ट लिहिणारा व्यावसायिक. त्या कलेचा/विद्येचा/ज्ञानाचा उपयोग करून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे प्रयत्न करतोय. अभिप्राय, सूचना, … जरूर कळवा. चांगली टीका हवी आहे.  […]

1 139 140 141 142 143 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..