मोटारीच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक कार कंपन्या जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात विलुप्तदेखील झाल्या. मात्र यातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा कंपन्या आहेत ज्यांची प्रतिष्ठा आणि रुबाब हा अद्याप अबाधित आहे. आणि त्यांपैकी एक कंपनी म्हणजे रोल्स रॉयस. […]
लेनिन यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशालिस्ट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. लेनिन कुशाग्र बुद्धिमत्तेचा साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनिय व नेत्रदिपक आहे. […]
अनंत वेलणकर आणि ज्योत्स्ना गोखले अशी मराठी नावं, तीही एखाद्या हिंदी सिनेमातील हिरो -हिरॉईनची, सोबतीला गुप्ते ,पाटील असे पोलीस अधिकारी (मुंबईतला सिनेमा म्हणून ), माधुरी पुरंदरे आणि सदाशिव अमरापुरकर अशी दिग्गज मंडळी आणि या सर्वांना एकत्र आणणारी मराठमोळ्या विजय तेंडुलकरांची दाहक लेखणी ! आज यातील ओम पुरी, अमरीश पुरी, शफी इनामदार, सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, दस्तुरखुद्द तेंडुलकर सारे सारे काळाने आपल्या पडद्याआड नेले आहेत पण “अर्धसत्य ” काही विसरता येत नाही. […]
जगाची जशी भौगोलिक रचना असते, ती पदार्थाची अथवा निर्जीव साधनांची असते. त्याच वेळी जो इतिहास बनत असतो तो सजीव प्राणीमात्रांचा. मानवी देहांत देखील अशाच प्रकारे इतिहास भूगोलाची सतत पुनरावृत्ती होत राहते. शरीरातील अवयवांची वाढ होत जाणे आणि त्याच वेळी अनेक रोगांची देहावर आक्रमणे होणे त्याच प्रकारचे ठरते. ह्यांत तोड-मोड-जोड होत राहते. नष्ट होणे वा विकास पावने सतत घडत जाते. […]
पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा. त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच. तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे. आम्ही निरीक्षण करायचो. एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते. आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते. आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो. कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे. […]
दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. […]
फक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच. […]
श्रीरामभुजंगस्तोत्र हे श्रीरामाचे आदि शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र समजण्यास खूप सोपे व त्यामुळे भाविकांच्या मनाला भिडणारे आहे. समर्थ रामदासांच्या वाङ्मयामुळे व रामदासी संप्रदायामुळे महाराष्ट्रात रामभक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना हे स्तोत्राचे मराठी रूपांतर आवडेल अशी खात्री आहे. या स्तोत्राची रचना ‘ भुजंगप्रयात ’ (यमाचा यमाचा यमाचा यमाचा) या वृत्तात केली असल्याने त्याला ‘ रामभुजंगम् ’ असे नाव दिले आहे. अपवाद श्लोक २२ चा. तो रथोद्धता वृत्तात (राधिका नमन राधिका लगा) आहे. […]
“खामोशी” शब्दांच्या पलीकडला – वहिदा, राजेश, धर्मेंद्र, गुलज़ार, ललिता पवार, देवेन वर्मा आणि हेमंतदा या साऱ्यांचा परिसस्पर्श मिरवणारा ! आज ५० वर्षांचा झालाय पण आपल्या रुग्णाच्या प्रेमात (एकदा नव्हे दोनदा) पडून त्याला बरं करण्याच्या नादात व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील रेषा विसरणारी नर्स वहिदा आजही स्मृतीत लखलखीत आहे. […]
“मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला… मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते… अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते… काय अर्थ असेल याचा? रासायनिक प्रक्रियेचे क्लिष्ट समीकरण आहे असं वाटतंय, पण त्याचे करायचे काय? काय करायचं आहे आपल्याला? … […]