नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

चिचा

आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते. […]

अत्तर, म्हैसूरपाक आणि तुळस

दामू .. एक अजब रसायन .. खरं तर वृद्धाश्रमाच्या संस्थापकांच्या गावातला , “चारच बुकं” शिकलेला तरुण .. विसाव्या वर्षीच आई वडिलांचं छत्र हरपलं म्हणून त्या दयाळू संस्थापकांनी त्याला आश्रमात आणलं आणि तो तिथलाच होऊन गेला .. आत्ता असेल साधारण “चाळीशीच्या” आसपास …. स्वयंपाक घरातल्या आचाऱ्यापासून साफसफाई करणाऱ्या मावशीपर्यंत सगळ्यांना मदत करायचा .. बागकाम मन लावून करायचा .. आश्रमात येणाऱ्या सगळ्या आजी-आजोबांच्या मनाचा ठाव घेत लगेच आपलसं करणारा असा हा कायम हसतमुख आणि बोलघेवडा गडी.. […]

शिवजातस्य संभाजी महाराज : पूर्वार्ध

छ. शिवाजी महाराजांनी अहोरात्र झटून राज्य साधनेची लगबग करून, सह्याद्रीच्या कुशीत एक स्वाभिमानी स्वराज्य उभे केले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्या स्वराज्याची जबाबदारी छ. संभाजी महाराजांनी तितक्याच ताकदीने उचलली आणि स्वराज्याचे रक्षण करताना अखेर स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न…. […]

एअर इंडिया भारत इंग्लंड हवाई सेवा

८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती. […]

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ केविन वॉर्वीक

केविन वॉर्वींक याला मी भेटलो आहे त्याचे लेक्चर ऐकले असून एक भन्नाट शास्त्रज्ञ असून माणसापेक्षा यंत्र श्रेष्ठ आहे असे म्हणतो… त्याने काय शोध लावले ते जरा वाचा, वाटल्यास गुगलवर सर्च करून बघा.. समोरच थोडासा साधा पटकन मिसळणारा केवीन वोर्विक उभा होता. आत्ता तो 65 वर्षाचा आहे , मी त्याला भेटलो तेव्हा तो पन्नाशीचा असावा पण कुठलेही अवडंबर न माजवता तो गप्पा मारू लागला. तो ठामपणे म्हणत होता माणसापेक्षा मशीन श्रेष्ठच आहे आम्हा मानवतावादी लोकांना निश्चित ते खटकणारे होते. पण तो कुणाचीच पर्वा करता तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. […]

आनो ही! (तो दिवस!)

ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली! हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं.. कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल.. […]

जागतिक अन्न सुरक्षा दिवस

७ जून २०१९ रोजी पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर २०१८ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे. […]

ती ‘खूप काही’ करते..

तिच्या नकळत ‘ती’ काय काय करते याची जाणीव तिलाही नसते..तेव्हा, अशी आपली एखादी ‘गृहिणी’ मैत्रीण, बहीण, शेजारीण आपल्याला भेटली तर ‘ती’ काही करत नाही असं म्हणून तिला दुखावण्यापेक्षा ‘ती’ खूप काही करते हे तिला सांगुया..’ती’ एक शक्ती तत्व आहे याची तिला जाणीव करून देऊया. […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १०

ऍक्वेरिअम म्हणजे एक प्रचंड मोठे तळं होते. तळ्याच्या मध्यभागी एक गोलाकार ऐसपैस, रुंद मनोरा बांधला होता! किनाऱ्यावरून मनोऱ्यापर्यंत जायला चांगला 20 मिनिटाचा बोटीचा प्रवास करावा लागला. मनोऱ्याचा पहिला मजला पाण्याच्या वर आणि नंतरचे 9 मजले पाण्याखाली होते. त्याचा खाली काँक्रिटचे कॉलम. तसे तळं 300 फूट खोल होत, कॉलम बुडाशी असलेल्या एका टेकडी वर बांधला होता. […]

‘पुणेकर’ तेथें चि जाणावा…

जगातील कोणत्याही देशाच्या नागरिकाच्या ‘तुम्ही कुठले?’ या प्रश्नाला जेव्हा ‘मी पुणेकर!’ असं उत्तर मिळतं तेव्हा समोरची व्यक्ती त्याच्याकडे आदराने पाहू लागते. इतकी पुणेकरांच्या मागे ‘पुण्याई’ उभी आहे… पुणे म्हणजेच पूर्वीचं ‘पुनवडी’ला शतकांपासूनचा इतिहास आहे..अगदी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, टिळक, आगरकर पासूनचा! […]

1 131 132 133 134 135 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..