त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत. पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत. […]
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. […]
आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची. […]
मराठी चित्रपटांत ललिता पवार, अलका इनामदार, आशा पाटील, सरोज सुखटणकर, लता अरूण, वत्सला देशमुख, माई भिडे, हंसा वाडकर, सुमती गुप्ते, इत्यादींनी ‘आई’ साकारली आहे. नव्या पिढीनुसार मराठी चित्रपटांतील आजची आई बदललेली आहे. तिनं नवीन टेक्नॉलॉजी समजून घेतलेली आहे. आयटी क्षेत्रात काम करुन ती घर-संसार करते आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाॅटसअप, ट्वीटर, ब्लाॅग ती लीलया हाताळते आहे. माॅड असली तरी ती काळाप्रमाणे चालणारी एक ‘आई’च आहे. […]
इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय.बी.एम. ही आयटी क्षेत्रातील जगात दुसर्या क्रमांकाची कंपनी म्हणून जगजाहीर आहे. “आयबीएमचा सेल्समन अथवा कर्मचारी क्षणाला काही न काही विकत असतो” हे वॅटसनचे वाक्य मात्र आपल्याला विचार करायला लावते. […]
१९७५ सालची गोष्ट आहे. हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत ‘अंकुर’ सारख्या कलात्मक चित्रपटाने सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले. शबाना आझमी, अनंत नाग, साधू मेहेर आणि आपली मराठी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिचा ‘अंकुर’ चित्रपट मी भानुविलास थिएटरमध्ये ‘मॅटिनी शो’ ला पाहिला. […]
जर एखाद्या अस्सल पुणेकराचे डोळे व कान बंद करुन पुण्याची सफर घडवली तर तो त्याला नाकाने जाणवणाऱ्या त्या त्या परिचित गंधावरुन ते ते ठिकाण हमखास सांगू शकतो. मी हा प्रयोग एकदा केला. एका अस्सल पुणेकर मित्राचे डोळे व कानावरुन काळी पट्टी लावून त्याला पुण्यातून अनेक ठिकाणी उलटे सुलटे गाडीवरुन फिरविले. मी जिथे जिथे त्याला घेऊन गेलो, त्यानं मला पोपटासारखी ‘अचूक उत्तरं’ दिली. […]
समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल काढून घेतल्यावर पावलाच्या पोकळीचं छान घरटं तयार होतं व एक ‘घर’ तयार केल्याचा त्यांना अवर्णनीय आनंद मिळतो. […]
लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो. […]