बुलेट ट्रेनचे जपानी भाषेतले नाव शिनकानसेन. जपानला एकत्र बांधून ठेवणार्या प्रमुख धाग्यांमधील एक.. एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा प्रवास काही तासात घडवून आणणारी जगातली सर्वात वेगवान रेल्वे – शिनकानसेन.
“खरोखरच…जमिनीवर धावणारी विमाने आहेत!” असं म्हंटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही अशा डौलाने ह्या शिनकानसेन धावतात.
३०० किमी प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने! म्हणजे कल्पना करा किती स्पीड असेल (मुंबई-पुणे प्रवास ६० मिनिटांच्या आत पूर्ण करतील इतका). […]
युगानुयुगांपूर्वी (आता असंच म्हणायला हवं- १४ महिने चित्रपटगृहातील पडदा आणि नाटकाचा रंगमंच पाहिला नाही) पुण्याच्या बालगंधर्वला ” बाबला अँड हिज ऑर्केस्ट्रा “ला गेलो होतो दोन कारणांसाठी – ” कालीचरण ” ची टायटल ट्यून देणारा बाबला आणि “धर्मात्मा” साठी गायलेली कंचन या जोडीला ऐकण्यासाठी ! […]
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा सर्वप्रथम ठराव करण्यात आला तो 1946 च्या बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात! पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. समितीच्या आंदोलनातून महाराष्ट्राची निर्मिती झाली, परंतु ती संयुक्त महाराष्ट्राची नव्हती, तर अपूर्ण महाराष्ट्राची! […]
घर, देता का कुणी घर…असं अप्पा बेलवलकरांना ‘नटसम्राट’ नाटकातील स्वगतामध्ये बोलावं लागलं…मात्र चहा, देता का? असं अजून तरी कुणालाही म्हणायची वेळ आलेली नाही…. न मागता हजर असतो, तो चहा!! सकाळच्या पहिल्या चहा पासून संध्याकाळपर्यंत त्याची अनेकदा आवर्तनं होतातच. […]
जगातील प्रत्येक जण आपल्या जीवनात त्याच्या आवडीनुसार काही ना काही छंद जोपासतोच. त्या छंदाला जर योग्य खतपाणी मिळाले तर त्याचा विशाल वटवृक्ष होतो व त्या सावलीत अनेक उत्सुक वाटसरु रममाण होतात. पुण्यातील बाजीराव रोडवरील राजा दिनकर केळकर संग्रहालय हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. मी शाळेत असताना ते पाहिले होते. पुण्याला भेट देण्याऱ्या पर्यटकांसाठी ‘पुणे दर्शन’च्या स्थळांमध्येही […]
वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल भक्तांचा संप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. समर्थ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. मला वाटतं वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये थोडीशी “फट “असली तरीही समर्थांचे वरील सार्वकालिक वचन सगळ्यांनी ध्यानी ठेवले तर “भक्ती संप्रदाय समन्वय” वेगळा समजावून सांगण्याची गरज भासणार नाही. […]
“हे माझे घर शब्दांचे”. लिम्का रेकॉर्ड २०१६ ह्यांनी नोंद घेतलेली एकमेव “स्वाक्षऱ्याची भिंत”. “सह्याजीराव – सतीश चाफेकर” – ह्यानी गेली ५० वर्षे स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद जोपासलेला आहे, आजमितीस त्यांच्याकडे १०००० हून अधिक स्वाक्षऱ्या आहेत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणचेच “स्वाक्षरी संग्रहालय” […]
एकेकाळी पुण्यामध्ये बहुतांश कोळशाच्या ज्या वखारी होत्या त्या शीखांच्याच होत्या. आता वखार क्वचितच दिसते. जेव्हा कधी मी एखादी अशी वखार पाहतो, तेव्हा मला शेठजींची आठवण येते.. एका पंजाबी माणसाने माझ्या वडिलांना मोठ्या भावाचं प्रेम दिलं, आपुलकी दाखवली… काळानुरूप आता अशी शेजारधर्म जोपासणारी माणसं समाजातून कमी होत गेली… […]
मॉल प्रशस्त होता, हायफाय होता, आकर्षक होता. चकचकीत होता आणि अत्याधुनिक होता. इंटिरिअर भुरळ पडणारे होते. कुठल्याही बाजूने पाहिले तरी सहज दिसणारे, उंचावर असणारे, रंगीत, झगमगीत असे मॉलचे नाव खुणावत होते. मटालोखा मॉल […]
दरवाजात दस्तुरखुद्द रत्नाकर मतकरीच उभे होते. हाफ पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे टी शर्ट त्यांनी घातले होते आणि हसतमुख नजरेने माझ्याकडे बघत मला म्हणाले सौरभ महाडिक ना? मी म्हंटले हो, तर म्हणाले मी आणि गणेश तुझीच वाट बघत होतो. घर व्यवस्थित मिळाले ना? मी म्हंटले हो अगदी व्यवस्थित मिळाले. फक्त तुमच्या घराचे वर्णन खूप जणांकडून ऐकल्यामुळे तुमचे राधा निवास हे बाहेरून तसेच आहे हे अनुभवण्यासाठी जरा तुमच्या बिल्डिंगमध्ये मी आजूबाजूला भटकलो हे सांगताच मतकरी काका मोकळेपणाने हसले.. […]