नवीन लेखन...

शैक्षणिक

असंच असतं ना आयुष्य ?

आयुष्य तर किती एकसारख्या अशा हुलकावण्या आपल्याला देत असतं ना! अगदी आता-आता आपलं सारं सुख, आपला आनंद, किंवा आयुष्याचं मर्म आपल्या जवळ दिसू लागलंय, म्हणेपर्यंत निसर्गाने कूस बदलून घ्यावी, साऱ्या दिशाच विस्कटून, टाकाव्यात, असे काहीसे खेळ चालू असतात त्याचे! […]

‘क’ कावळ्याचा

(लेखक – प्रतीक मिटकरी ) – पितृपक्ष सुरू झाला आणि वर्षभर अन्नासाठी उकिरड्यावर तसेच घाणिवर फिरणारे कावळे पंधरा दिवसांसाठी आपले पुर्वज झालेत…. पितरांना कावळा शिवला की म्हणे पुर्वजांना मोक्ष मिळतो… पण काय हो या मोक्षाला एक वर्षाचीच Validity असते का? […]

विमानप्रवासाचे विज्ञान

विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो. […]

अहंकार – अर्थात Ego…….

सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ? […]

निमित्य गोकुळाष्टमी – जन्म नव्या ‘कृष्णा’ चा !

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवाच, या आशयाच्या पोस्ट या आधी वाचल्या सुद्धा असतील, जो मदत करतो, हात देतो, धीर देतो, अब्रू वाचवतो, शिष्टाई करतो, रण सोडून पळून जातो, रणांगणात हत्यार उचलत नाही, सारथी बनतो, सखी बनून खेळतो, खेळवतो….. […]

प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे  दोन प्रमुख शेअर बाजार आहेत.  या ठिकाणी  शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर  शेअरची किमत  ठरत असते. ही दोन्ही  मार्केट  बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर  सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते. […]

अंकांची नवीन पद्धत

अंकांची नवीन पद्धत.. संदर्भ – बालभारती चें गणिताचें नवीन पुस्तक व सर्वत्र सुरूं असलेली चर्चा… ही नवीन पद्धतीच्या अंकलेखनाची बाब काय आहे हे जर कुणाला माहीत नसलें तर, त्याची थोडक्यात माहिती करून घेऊं या. बालभारतीच्या नवीन पुस्तकात अंक लिहायची अशी नवी पद्धत दिलेली आहे. “वीस एक एकवीस”, “वीस दोन बावीस” वगैरे. या पद्धतीवर बर्‍याच लोकांचा आक्षेप आहे. […]

बाबाची आठवण…..

काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा […]

राब

केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]

बाव (विहीर)

आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]

1 101 102 103 104 105 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..