नवीन लेखन...

बाबाची आठवण…..

काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा तो दिवस आहे ज्याची वाट प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने पाहतो .प्रत्येकाची ती जिवणपरिक्षा असते . तशी माझ्याही विचारांची घालमेल मनात सतत सुरू होती बाबाचा फोटो पाहून…. त्या जीवन परीक्षेबाबत ,विचारा विचारात नकळत आठवले ते दिवस .मी बारावी पास झाली मी मेडीकल ला जाणारी पण खूप वादळ येऊन गेले आयुष्यात कारण बाबाचे ठीक दुसर्या दिवशी कॅन्सर ने  निधन झाले मी बाबाच्या लाडकी लेक .आयुष्याच नकोस वाटले होते बाबा गेल्यावर मग तिथे जीवनाचा काय प्रश्न .मी फक्त बाबाच्या दुःखात बाबांना ओल्या डोळ्यांनी शोधत फिरणारी .पण अश्यात माझा भाऊ याने तो जिथे शिकला त्याच लॉ कॉलेज मधे प्रवेश केला माझा .माझे वक्तृत्व अतिशय चांगले त्यामुळे माझ्या आपल्याना तो निर्णय फार आवडला .मी कॉलजमध्ये जाण्याचे टाळत होते पण आई कडे पाहून परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती तेव्हा कॉलेज सुरू केले.नवीन अभ्यासक्रम हातात पडणारी भलीमोठी पुस्तक .कॉलेजमधील अभ्यासक्रम शिकून झाला .क्लासमेट नवीन शिक्षक ही नवीन पण न घाबरता आत्मविश्वासाने मी अभ्यास सुरू केला .पातूर ते अकोला बस ने प्रवास करावा लागत असायचा बस स्टँड वर गेले की बाबाची आठवण यायची .. बाबाच्या ओळखीचे लोक दिसायची तिथेच नकळत आसवे डोळ्यातून वाहत असायची.तो रोजचा बस चा प्रवास माझ्या सदैव आठवणींचा राहील .कारण मी सलग तीन वर्षे बस मध्ये माझे आसवे पुसत पुढे गेलेली आहे .बस वेगाने धावायची त्यापेक्षाही वेगाने माझे मन धावायचे बाबांच्या आठवणी मध्ये ….पण दुःखाने व्याकुळ झालेल्या मनाला बाबा  गेल्यावर ज्यांनी मला धीर दिला असे माझे आई भावंड आणि माझ्या बाबाचे मित्र मोहन जोशी काका या सर्व लोकांनी मला जो धीर दिला आज त्या धिरामुळे मी स्वतःला सावरत इथपर्यंत आले असे मला वाटत होते.विचारा विचारात सकाळ झाली .मी लवकर तयार होऊन नेहमीच्या बस स्टँड वर आली .आजचा तो दिवस आहे जो कशा आला केव्हा आला मला कळत नव्हतं असे मनात विचार चालू होते .मी फार उत्सुक होते निकाल पाहायला .बस मध्ये बसून केव्हा अकोला आला कळलेच नाही. कॉलेज मध्ये पोहताच सर्व मैत्रिणी भेटल्या माझ्या नवीन प्रकाशित पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देत.आमच्या चांडक मॅडमने ही माझे खूप कौतुक केले.सगळाच आधीपेक्षा वेगळं घळत होत निकाल या वेळी ऑफलाईन लागला होता त्यामुळे निकाल पहायची आतुरता शिगेला पोचली होती.लवकरच आमचा निकाल मॅडमच्या हाती आला आम्ही सर्व कॅबिन मध्ये गेलो सर्वांचा  एकामागून एक निकाल कळत होता.आता मॅडमनी माझी मार्कशीट हातात घेतली अन् मी फर्स्ट क्लास पास झाल्याचे कळवले .कॉलेज मध्ये टॉपर येण्याचा आनंद तर होताच पण ह्या क्षणाला माझे नकळत डोळे भरून आले.कारण माझ्या मैत्रिणी त्यांच्या बाबांना कॉल करून निकालाची बातमी देत होत्या .त्यावेळी मला वाटले आज माझे बाबा असते तर मी फर्स्ट क्लास टॉपर आल्याचे त्यांना किती कौतुक असते .अभिमानाने त्यांनी माझी पाठ थोपटून मला कौतुकाने अॅडव्होकेट म्हणून  हाक मारली असती क्षणभर मी त्या निकालाच पाहत राहिला .ती माझी गेलेली पाच  आठवणींचे आठवत .तेवढ्यात मैत्रिणीने विचारले विशाखा तू घरी कॉल नाही केला मग लगेच भानावर येत माझ्या भावा बहिणींला  कॉल करू सांगत मी ती आनंदाची बातमी त्यांना दिली सांगताना डोळे भरून आले अन् लगेच कॉल कट केला .सर्वांसारखे माझेही स्वप्न होते. की बाबाचे नाव मोठं करावे अन् त्यावेळी कौतुकाने त्यांनी मला शाबासकी द्यावी .पण मात्र सदैव मन ते सोबत असल्याची जाणीव करून देते .कारण जेव्हा मी पेपर  द्यायला जायची तेव्हा मैत्रिणीचे बाबा याचे  तेव्हाही माझ्या भोळ्या मनाला मनात बाबा नसल्याची उणीव करून जायचे …असे आसवांच्या पुरात गेलेली माझे पाच वर्षे पूर्ण झाली अन् आज तो निकालाचा दिवस माझ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी गाथा लिहीन गेला हा माझा दुःखाचा प्रवास या वेळी सोबतीला होत्या माझ्या बाबांच्या आठवणी माझ्या सोबत आहेत जे मला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त लढ विशाखा असे म्हणतात.कालचा निकालाचा दिवस हा सदैव माझ्या स्मरणात राहील…… कारण ती माझ्या जीवनातील पहिली  यशाची पायरी मी चढले पण खरे बाबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला त्यांच्या आठवणीला जीवन नौका करीत …कारण बाबाचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे.

अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जि.अकोला

Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar 18 Articles
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..