नवीन लेखन...

प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

 

प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

(शेअर मार्केटशी मैत्री लेख ४)

शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे  दोन प्रमुख शेअर बाजार आहेत.  या ठिकाणी  शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर  शेअरची किमत  ठरत असते. ही दोन्ही  मार्केट  बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर  सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते. या वेळेत कॅश मार्केट, मार्जिन ट्रेडिंग, डेरीवेटीव (future/option) यां प्रकारचे सौदे होत असतात. ऑक्टोबर २०१० पूर्वी प्री ओपनिंग सेशन नव्हते. मुळात शेअर मार्केट हे मुळात सेन्सिटिव्ह आहे. अनेकदा एखाद्या कंपनी संदर्भात काही बरी /वाईट बातमी मार्केट बंद झाल्यानंतर आली किंवा एखादी बरी /वाईट घटना घडली  तर दुसरे दिवशी मार्केट सुरु होताना सेन्सेक्स किंवा निफ्टी मधे मोठ्या प्रमाणात वाढ/घट होई. या प्रकारची मार्केट मधील volatility रोखण्यासाठी साठी काही तरी उपाय योजना करण्याची आवश्यकता होती. त्यामुळेच १८ ऑक्टोबर २०१० पासून  शेअर बाजारात प्री ओपनिंग ट्रेडिंगला  सुरवात झाली. त्यामुळे शेअरचे भाव अवास्तव वाढ किंवा घट दाखवत नाहीत. त्यामुळे पर्यायाने गुंतवणूकदारांचे हित जपले जाते.या प्रीओपनिंग सेशन मधून आपणाला रेग्युलर शेअर मार्केटसाठी शेअरचा सुरवातीचा भाव मिळत असतो. तसेच आज शेअर मार्केटचा मुड कसा राहणार आहे याचा अंदाज येतो.आज बरोबर ९ वाजता प्री ओपनिंग सेशन सुरु होते. निफ्टी आणि सेन्सेक्स यांचा कल या प्रीओपनिंग सेशन मधे समजतो आणि पंधरा मिनिटांनी शेअर मार्केटच्या रेग्युलर सेशन साठी निफ्टी/सेन्सेक्स या कंपन्याचे आजचे ओपनिंगचे भाव मिळतात म्हणजेच आज निफ्टी किंवा सेन्सेक्स यांची ओपनिंग समजते आणि रेग्युलर सेशनला सुरवात होते. प्री ओपेनिंग सेशन हा सर्वांसाठी आहे. मात्र सध्या फक्त निफटी व सेन्सेक्स शेअरच्या ओर्डर देता येतात. हा विषय समजायला थोडा क्लिष्ट आहे पण मी इथे सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतोय.

आता या प्रीओपनिंग सेशन बद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ. त्यासाठी सर्वप्रथम शेअर मार्केट मध्ये दिल्या जाणाऱ्या ऑर्डर ची माहिती असणे आवश्यक आहे.शेअर मार्केट मधे दोन प्रकारच्या ऑर्डर असतात.

मार्केट ऑर्डर ·         कोणताही भाव कोट न करता जो बाजारभाव चालू असेल त्याला खरेदी किंवा विक्री करण्याची ऑर्डर त्यामुळे बाजारभावाला सौदा होतो.
लिमिट ऑर्डर ·         एका विशिष्ठ भावालाच खरेदी किंवा विक्री करण्याची ऑर्डर, या प्रकारच्या ऑर्डर मध्ये जेव्हा खरेदी विक्रीची ऑर्डर जुळल्यास सौदा होतो.

शेअर बाजाराचे (NSE व BSE) प्रीओपनिंग सेशन बरोबर ९ वाजता सुरु होते. प्रीओपनिंग सेशन मधे पहिली आठ मिनिटे फक्त ऑर्डर नोंदवल्या जातात, बदलता किंवा रद्द करता येतात. पुढील चार मिनिटे ही ऑर्डर जुळण्यासाठी असतात.यामधे शेअरची equilibrium प्राईस (संतुलित किमत) ठरत असते. ही ठरवताना आलेल्या सर्व ऑर्डर, मागणी पुरवठा या सर्व बाबींचा विचारात घेऊन सिस्टीम एक संतुलित किंमत देते  व  या समतोल किंमतीला जुळणारया सर्व ऑर्डर एक्झीक्युट होतात व त्यानुसार सौदे होतात. न जुळणाऱ्या सर्व ऑर्डर रेग्युलर मार्केट मध्ये कॅरी फोरवर्ड होतात. या चार मिनिटात ऑर्डर बदलता किंवा रद्द करता येत नाहीत. यानंतरची ३ मिनिटे हा काळ प्री ओपन ते रेग्युलर मार्केट मधे परीवर्तीत होण्यासाठी असतात.

प्री ओपनिंग सेशन मध्ये संतुलित किंमत / equilibrium प्राईस कशी काढली जाते ते थोडक्यात पाहूया.

  • मागणी आणि पुरवठा या तत्वा नुसार शेअरची किमंत या इथे पण ठरते.
  • संतुलित किमंत (equilibrium price ) ठरवताना ज्यास्तीत ज्यास्त सौदा योग्य संख्या (Tradable quantity) आणि कमीत कमी न जुळणारे सौदे (unmatched order) हा मुख्य निकष लावला जातो.
  • प्री ओपनिंग सेशन मध्ये २० % ची कमाल / किमान किमंत मर्यादा लागू असते. म्हणजेच प्री ओपनिंग सेशन मध्ये ऑर्डर टाकताना कालच्या क्लोझिंग भावापेक्षा २० टक्के कमी किंवा ज्यास्त ऑर्डर टाकू शकत नाही.उदा. काल बाजार बंद होताना एखाद्या शेअरचा भाव १०० रुपये असेल तर आज प्री ओपनिंग मध्ये ८० रुपयापेक्षा कमी आणि १२० रुपया पेक्षा ज्यास्त रकमेची ओर्डर स्वीकारली जात नाही.

आता ही संतुलित किंमत कशी काढली जाते याची दोन उदाहरणे  पाहू.

समजा अम्बुजा सिमेंट कंपनीचा कालचा बाजारभाव २०० रुपये होता.(closing price) आज प्री ओपनिंग सेशन मधे खालील प्रमाणे ऑर्डर्स आल्या.

उदाहरण (१)

किमंत रुपये मागणी (Demand) पुरवठा (Supply) असंतुलितऑर्डर(unamatched orders)
१९० १२००० ९५०० २५००
१९५ १५००० १२००० ३०००
२०२ ७५०० १५००० ७५००
२०५ २७००० २५५०० १५००
२०८ ५४०० २७००० २१६००

वरील उदाहरणात रुपये २०५ ही संतुलित किंमत ठरते.

उदाहरण (२)

किमंत रुपये मागणी (Demand) पुरवठा (Supply) असंतुलितऑर्डर(unamatched orders)
१९० २५००० २२००० ३०००
१९५ ३५००० ३४००० १०००
२०२ ३२५०० ३६५०० ४०००
२०५ २७००० २५५०० १५००
२०८ ५४०० २७००० २१६००

वरील उदाहरणात रुपये १९५ ही संतुलित किंमत ठरते.

अशा प्रकारे सर्व सेन्सेक्स/निफ्टी कंपन्यांच्या सर्व शेअर्सच्या संतुलित किंमती मिळाल्यावर त्या दिवसाच्या रेग्युलर सेशनची ओपेनिंग price असते आणि मग रेग्युलर सेशनला सुरवात होते.

प्री ओपनिंग सेशन थोडक्यात गोषवारा

सेशन वेळ एक्शन किंवा कार्यवाही
ऑर्डर नोंदणी सकाळी ९.०० ते ९.०८ आपण शेअर खरेदी विक्रीच्या ऑर्डर नोंदवू शकतो, त्यात दुरुस्ती करू शकतो किंवा रद्द पण करू शकतो.(मार्केट किंवा लिमिट ऑर्डर)
ऑर्डर जुळणी किंवा समतोल किंमत काढण्याची प्रक्रिया. सकाळी ९.०८ ते ९.१२ एक्शेंज शेअरची समतोल किमंत ठरवते जी त्या दिवसाची सुरवाती किंमत असते. या किमतीला सर्व पात्र (eligible) नोंदल्या गेलेल्या ऑर्डर एक्झीक्युट म्हणजेच कार्यान्वित होतात, व बाकी सर्व ऑर्डर रेग्युलर मार्केट साठी पाठवल्या जातात, या काळात ऑर्डर बदलता किंवा रद्द करता येत नाही.
बफर कालावधी सकाळी ९.१२ ते ९.१५ प्री ओपनिंग सेशन हे नॉर्मल ट्रेडिंग मार्केट मधे परिवर्तीत होण्यासाठीचा कालावधी
सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० रेग्युलर सेशन

 

(लेखासाठी शेअर विषयी वेब साईटचा आधार घेतला आहे)

— विलास गोरे

Avatar
About विलास गोरे 19 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..