नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

बाप बिलंदर बेटा कलंदर

कांबळेंबद्दल आम्हाला काही वेळा हे खरंच चित्रकार असावेत का? अशी शंका येत असे. कारण त्यांनी स्वत:चा काम करताना फोटो दाखवला नाही. कधी कागदावर स्केचसुद्धा काढून दाखवलं नाही. […]

काळाच्या पडद्याआड जाणारी सिनेमाघरं..

मार्च महिन्यापासून ‘कोरोना’मुळे लाॅकडाऊन सुरु झालं आणि सर्व टाॅकीज ‘व्हेंटिलेटर’वर गेल्या. टाॅकीजमध्ये जळमटं वाढलीत. खुर्च्यांवरती धुळीची पुटं चढलीत. मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला हा दुष्परिणाम जागतिक चित्रपटसृष्टीचं सर्वात मोठं नुकसान आहे. […]

झुणका भाकर

शिवसेनेने पुण्यातील झुणका भाकरला मिळालेली लोकप्रियता पाहून १९९५ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात झुणका भाकर केंद्रं सुरू केली. […]

‘च्या’ भर रे..

आमच्याकडे कुणी पहिल्यांदा आलं की, आम्ही त्याला ‘चंद्रविलास’ मध्ये घेऊन जायचो. त्यावेळी झोरेचे वडील गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यावेळचे ‘चंद्रविलास’ जुन्या काळातील हाॅटेलचा एक उत्कृष्ट नमुना होते. […]

“सख्खे शेजारी”

खूप वर्षांपूर्वी कुठंतरी वाचलं होतं, ‘शेजारी’च आपला खरा ‘पहारेकरी!’ जुन्या काळी चाळींमध्ये राहणारी माणसं एकोप्याने नांदायची. प्रत्येक कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्याचं आपुलकीने लक्ष असायचं. जमाना बदलला. आता चाळी पाहायलाही मिळत नाहीत. […]

कढीपत्ता

विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघात रोज संध्याकाळी पेन्शनर मंडळी जमायची. त्यातील आठ दहाजणं नियमित यायची. त्या ग्रुपमध्ये नाना न चुकता हजेरी लावायचे….. […]

वाहतो ही ‘शब्दां’ची जुडी

१९६४ रोजी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचा शुभारंभ झाला व आशाजींच्या ‘ताई’ने शेकडो प्रयोगांतून लाखों नाट्यरसिकांच्या मनात कायमचं ‘घर’ केले. […]

“चोचीतले दाणे”

समीरचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. तो शहरातील एका मोठ्या प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होता. घरात आई, वडील आणि हे दोघं असं चार जणांचं कुटुंब. त्याच्या पाच वर्षांच्या कामाच्या कौशल्यावर खुष होऊन प्रेसचे मालकांनी त्याला सिनीयर ऑपरेटरची पोस्ट दिली होती. समीर सकाळी नऊ वाजता घरुन निघायचा. दिवसभर उभं राहून काम केल्याने दमून संध्याकाळी सहा वाजता परतायचा. […]

“नि:शब्द ‘संदेश’ “

‘संदेश’चा खरा सीझन दिवाळीच्या आधी दोन महिने सुरू होत असे. १९८५ साली सर्वांत अधिक दिवाळी अंक बाजारात आले. त्यावेळी कामगार वर्ग रात्रपाळी करीत असे. एवढ्या संख्येने दिवाळी अंकाचे वितरण करुन त्याचा हिशोब ठेवणे ही मोठी अतर्क्य गोष्ट होती. […]

छोटी अशी बाहुली, मोठी तिची सावली

नृत्यदिग्दर्शिका म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक म्हणजे आठ वेळा फिल्मफेअर ॲ‍वाॅर्ड मिळविणारी ही एकमेव ‘डान्समास्टर’ होती. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी व नंदी ॲ‍वाॅर्ड विजेती सरोजने सुमारे दोन हजार गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केलेले आहे. […]

1 20 21 22 23 24 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..