नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

जे का संकटी अडकले

आज मुंबईत हजारो करोडपती आहेत, त्यातील एखाद्याच सोनूला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे देखील फार मोलाचं आहे. कोरोनामुळे अनेकांनी परराज्यातील लोकांसाठी आपले दरवाजे बंद केले, सोनू सूदने आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहचविले. […]

‘हसमुख सीमा’

सीमा बद्दल एकच वाईट वाटतंय की, इतक्या वर्षात एकही योग्य असा तरुण तिला भेटू नये? लग्नाचं वय एकदा निघून गेल्यावर सीमासारख्या मुलींनी कसं जगायचं? […]

‘गुण’ गौरव गाथा

एखाद्या समारंभात, प्रदर्शनात दहा पंधरा वर्षांनंतर कुणी स्नेही भेटला की, आवर्जून विचारतो, ‘तुमचं ऑफिस पूर्वी आलो होतो, तिथंच आहे ना? ‘गुणगौरव’ बिल्डींगमध्ये?’ मी त्याला होकार देतो. […]

‘जेथे जातो तेथे’

शहरातील एक नावाजलेले क्लिनिक. तेथील डाॅक्टर परदेशातून शिकून आलेले. त्यांच्या बोर्डवरील अनेक पदव्या त्यांचं विविध मानवी आजार बरे करण्यातील श्रेष्ठत्व दाखवत होते. […]

‘चांदोबा’ भागलास का?

१९५२ च्या एप्रिल महिन्यात ‘चांदोबा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. संपादक प्रशांत यांनी एकूण बारा भाषांमधून ‘चांदोबा’ प्रकाशित केले आणि भारतातील करोडों आबालवृद्धांचे आजतागायत मनोरंजन केले. […]

वैभव संपन्न आपलं घर

नावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. […]

‘डीपी’ नव्हे, प्रतिबिंब!

‘देवआनंद’चा ‘डीपी’ असतानाच मी फेसबुकवर लेख लिहू लागलो. माझा लेख वाचून अभिप्राय देणारे वाचक हळूहळू वाढू लागले. त्यामध्ये एक आशा पारेखचा ‘डीपी’ असलेली मुलगी पोस्ट वाचून अभिप्राय द्यायची. कधी रोजची पोस्ट दिसली नाही तर मेसेंजरवर ‘आज काही लिहिलं नाही का?’ असं विचारायची. […]

सुपारीचं खांड

व्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे. […]

भातुकलीच्या खेळामधली

भानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे. […]

आजची ‘प्रतिज्ञा’

आम्ही फक्त आमची वडिलोपार्जित जमीन गुंठा, गुंठा करुन विकणार आणि चारचाकी घेऊन चार टाळक्यांबरोबर ऐश करणार. वाढदिवसाचे मोठ्ठे फ्लेक्स बोर्ड झळकवणार. जयंतीनिमित्त मिरवणुका काढणार. अनुदान मागणार, मोर्चे काढणार आणि शेवटी आत्महत्या करुन ‘अमर’ होणार. […]

1 18 19 20 21 22 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..