शूर जया
शोभा गोखलेचं लग्न होऊन ती रानडेंच्या घरात सून म्हणून आली आणि ते घर आनंदाने भरून गेलं. तिच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने तिने सगळ्यांची मने जिंकली होती. घरात सासरे दिनकरराव, सासूबाई रमाबाई, मोठे दिर श्रेयस व जाऊबाई वैदेही वहिनी आणि त्यांची चिमुरडी मुलगी जया या सर्वांना शोभाने आपलंस केलं होतं. […]
