नवीन लेखन...

रेल्वे पोलिस आणि मी – भाग १ (आठवणींची मिसळ ०९)

तुम्ही सर्वांनीच अनेक वर्षे लोकलने किंवा अनेकवार दूर जाणाऱ्या गाड्यांनी प्रवास केला असेल आणि तरीही तुमचा कधीही रेल्वे पोलिसांशी संबंध आला नसेल. बहुतेकांनी रेल्वे पोलिसांना ओझरते कुठेतरी पाहिल्याच आठवत असेल. त्यामुळे तुम्हाला माझ्या आजच्या लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटलं असेल. लेख लिहिण्याएवढा यांचा रेल्वे पोलिसांशी काय संबंध? विचार योग्य आहे.पण माझ्या बाबतीत अशा मजेदार घटना घडल्या की रेल्वे पोलिसांनी नाकी दम आणला. […]

उगाच काहीतरी – २

सोशल मीडिया आल्यापासून काही नतद्रष्ट लोकांनी चंगच बांधलेला आहे की आपल्याला एक ही सण आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने करू द्यायचा नाही. हे लोक इतर वेळेस झोपलेले असतात पण एखादा सण आला की यांना जाग येते आणि मग पोस्ट सुरु होतात. […]

गरज आहे हमखास यशस्वी होण्याची

आजच्या जगात यशस्वी होण्याची व्याख्या आणि अर्थ ह्यामध्ये व्यक्तिनुसार फरक असू शकतो. शरीराने आपण रोजच्या अत्यंत तणावग्रस्त अशा रहाटगाडग्यात अडकलेले असतो. पण व्यक्तीच्या मनात स्वत:ची अशी अनेक स्वप्नं तरळत असतात. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४६ – यशोधरा दसप्पा

१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहात ही त्यांनी भाग घेतला ज्याचे फलित १२०० लोकांना कारावास भोगावा लागला. विदूरश्वथ जे कर्नाटकातील एक गावा आहे, तिथल्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी समोरच्या घोळक्यावर गोळ्या झाडायला सुरवात केली, ३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि बाकीच्यांना कारावास मिळाला, श्रीमती यशोधरा दसप्पा त्यापैकी एक होत्या. त्यांचे घर म्हणजे भूमिगत सत्याग्रही लोकांसाठी हक्काची जागा. स्वातंत्र्य चळवळीतल्या सेनानी, वीरांगना ह्याचीभेटण्याची जागा. आपल्या देशातील एका वास्तू ‘हॅमिल्टन’ हे नामविधान त्यांना मान्य नव्हते, त्यासाठी त्यांनी अनेक पत्र लिहिलीत, अनेक ठिकाणी भाषणे दिली. […]

आय एम इन अ मिटिंग

माझं देशपांडेंकडे काही काम होतं. मी देशपांडेंना त्यांच्या मोबाईलवर फोन केला. देशपांडेंनी फोन घेतला. मी माझं नाव सांगितलं व त्यांना बोलण्यासाठी वेळ आहे का ते विचारलं. “आय एम इन अ मिटिंग, आय विल कॉल यू लेटर” देशपांडे दबक्या आवाजात उद्गारले. मी फोन बंद केला. देशपांडे मिटिंग आटोपल्यावर फोन करतील या समजूतीवर मी देशपांडेंच्या फोनची प्रतीक्षा करु […]

व्याकुळ स्पंदने

कसे? समजवावे स्पंदनांना सदैव ध्यास तुझाच गे त्यांना क्षण क्षण भिरभिरती लोचने व्याकुळ जीव तुज शोधताना सर्वत्र साऱ्या तुझ्याच गं खुणा सांगना कसे विसरु आठवांना अजुनही साऊलीत भास तुझे वाटते तूच सोबती गं चालताना अंतरी भावप्रीतीच्या उतुंग लाटा चिंब चिंब भिजतो मी झेलताना वास्तवता, तुजविण जीवघेणी सांगनां सावरु कसे मी जगताना खुणावे जरी सांज सांजाळलेली तरीही […]

समांतर व व्यावसाईक चित्रपटाचा समन्वय- बिमल रॉय

ज्या काळात हिंदी चित्रपटात कलात्मक सिनेमा हे नावही अस्तित्वात नव्हते त्याकाळात व्यावसायिक व कलात्मक चित्रपटाचा उत्तम संगम ज्याने साधला ते होते बिमल रॉय. त्यांनी मी कलात्मक चित्रपट निर्मितो असा धिंडोरा पिटला नाही.ते म्हणत मी अतिशय सामान्य कलाकार आहे.मला वाटते कि मी हे  लोकांसमोर मांडावे असे वाटते,  ते मी चित्रपटामधून मांडतो. […]

मुक्त विचार

मेंदूचा सक्रिय हिस्सा जेव्हा रिकामा असतो तेव्हा खूप काही नवं सुचतं, त्रास देणाऱ्या समस्यांची उत्तरे चुटकीसरशी मिळतात, शॉवर खाली असताना काहीतरी भन्नाट सुचून जातं. मानवी मेंदूची क्षमता अफाट असली तरी रोज जो अनावश्यक कचरा(क्लटर) आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांत कोंबत असतो, ती केराची टोपली चालताना अंशतः रिकामी होते. […]

टारगेट ७५० चे

यानंतर दोन मोठ्या कार्यक्रमांसाठी मी गायलो. माझे आवडते संगीतकार एस.डी. बर्मन आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा एक प्रदीर्घ कार्यक्रम इंद्रधनू या संस्थेने केला आणि माझे गुरू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या रचनांचा ‘श्रीकांतसंध्या’ हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकरता साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे आम्ही सादर केला. या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायिका रंजना जोगळेकर आणि निवेदक भाऊ […]

दृष्टिकोन

आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल  असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला  अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.        […]

1 21 22 23 24 25 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..