नवीन लेखन...

लोकनेता गोपीनाथ मुंडे

परिणामकारक, क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, याला फार महत्त्व असते. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना गुन्हेगारीविरोधात धडक कार्यवाही केली. पोलिसांना अधिकार दिले. ‘एन्‌काऊंटर’ हा शब्द त्याच काळात रूढ झाला. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या संगनमताच्या काळात एन्‌काऊंटर हा शब्द रूढ करणे, ही खरी गुणवत्ता होती.पोलीसदलामध्ये सुधारणा, मुंबईतल्या टोळी युद्धाला आळा घालणे, आणि जनसामान्यांनमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर गोपीनथ मुंडे, हे भाजप-सेना युतीमधला दुवा होते. दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. तर निवळण्याचं काम गोपीनाथराव करायचे. […]

पटकथाकार, लेखक अण्णासाहेब देऊळगावकर

विजय कोंडके यांच्या ‘माहेरच्या साडी’ने तर अनेक बाबतीत विक्रम केला होता. अण्णांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथा-संवादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवले. या चित्रपटाच्या हृदयस्पर्शी संवादांनी घराघरातल्या स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही काळजाला हात घातला होता. […]

अनोखा अनुभव

कुणाचा विश्वास असो वा नसो. माझ्या अनुभवानुसार माझा विश्वास आहे. माणूस गेला की सगळे संबंध संपतात असे म्हटले जाते. पण त्यांचा जीव कुणात तरी गुंतलेला असतो. माझी काकू शेवटच्या काळात बरीच वर्षे माझ्या कडे रहात होती. मूलबाळ नव्हते म्हणून आम्हालाच तिने आईच्या मायेने वाढवले होते. खूप कष्ट घेतले होते आमच्या साठी. शेवटी तिचे सोवळे ओवळे शहरात […]

भान हरपले विठ्ठला

भान हरपले विठ्ठला तुझ्या चरणी देह माझा, भोळ्या भक्तीचा तू भुकेला धाव घेई तू भक्तांच्या साह्याला रुप तुझे सावळे कटीवरी हात असे, मुखी विलसे हास्य सदा सावळ्या तू हरी विठ्ठला पंढरपुरी असे वास वर्णावे काय तुझे चरित्र, धन्य धन्य होतो जीव तुझ्या दर्शनाची आस हृदयी सदा — स्वाती ठोंबरे.

मन हळवं झालय

आजकाल मनावर होतात आघात आतामात्र मन खुपच हळवं झालय खरं तर, सारंकाही सोसलं पाहिजे कळतय तरी देखील कळेना झालय सुखानंदाची व्याख्या बदलली आहे भोगवादी सुखाकडं हे जग धावतय आपलेपणाची जाणीव शून्य झाली नात्यानात्यातली दरी मात्र वाढलीय जन्मदाते, ऋणानुबंध फक्त नावाचेच आस्थे ऐवजी अनास्था रुजु लागलीय खरं तर जसं वारं वहातं तसच वहावं हाच सुखाचा सोपा मार्ग […]

रम्य ते बालपण – लेखमालिका परिचय

अनघा दिवाळी अंक २०१९ मध्ये संपादिका सौ. विद्या नाले यांनी लिहिलेला ‘रम्य ते बालपण’ या लेखमालिकेचा परिचय. दोन शब्द… अनघाने गेले ४० वर्षे दिवाळी अंक देताना मराठी रसिकांची आवड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ४० वर्षांत धार्मिक अंक, विविध विषयांवर बेतलेले अंक तर काही वर्षी एखादा विषय देऊन मान्यवरांचे लेख मागविले होते. हा ४१ वा अंक […]

अभिनेत्री रिंकू राजगुरू

अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. ‘सैराट’ या एकाच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने ‘आर्ची’ची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाने तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या नायिकेपेक्षा अत्यंत विपरीत अशी नायिका रिंकूनं या चित्रपटात साकारली आणि प्रेक्षकांनी तिला […]

येणारे दिवस जाणारच

येणारे दिवस जाणारच पण आपण जस ठरविलेल आहे तसे दिवस जाऊ लागले तर उत्तमच पण आपल्याला माहिती आहे कि कोणत वित्रुष्ट येणाची संभावना आहे त्याचा सामना योग्य प्रकारे झाला कमीच कमी हानी झाली तर तोही आनंद हे ही ओळखावे. आपण काय करू कस वागू हे आपल्या हाती येणाऱ्या संकटांना ओळखून आत्मविश्वासाने सामना करणे हाहि निर्मळ आनंद […]

ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर

मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या. आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं. […]

अंबाक्का

या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली.. […]

1 44 45 46 47 48 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..