नवीन लेखन...

मृत्युंजय स्वा. सावरकर

दिनांक २८ मे म्हणजे एका तेजस्वी स्वातंत्र्यसूर्याची जयंती अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस.

स्वातंत्र्यसमरातील ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महान व्यक्‍ती होऊन गेल्या त्यात स्वा. सावरकरांचं खूप वरचं स्थान आहे. ज्या व्यक्तिमत्वाला कोठी कोटी प्रणाम केले तरी कमी पडतील अशा या स्वा. सावरकरांच्या स्मृतीपुढे त्यांच्या या जन्मदिनी नतमस्तक होऊ या. कारण स्वा. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हेत तर ते म्हणजे मध्यान्हीचा तळपता क्रांती सूर्यच होते.

छ. शिवाजीनंतर भारतमातेच्या पोटी जन्म घेतलेला एक असामान्य कट्टर हिंदु युवक होते. क्रांती घडवून आणण्यासाठी हातात शस्त्रे घ्यायला हवीत असे सांगणारे ते सशस्त्र क्रांतीचे महान उद्गाते होते. हौतात्म्यावर अधिक वाणीने भाष्य करणारे हुतात्म्यांचे प्रभावी प्रवक्ते होते. हिंटू धर्माबद्दल विचारपूर्वक भाष्य करणारे बुध्दिवादी भाष्यकार आणि हिंदुत्वाच्या अस्मितेचे सुत्ककार होते. त्यांचे मन प्रतिभावान महाकवीचे होते. त्यांची झेप गरुडाची होती. सूर्याला स्पर्श करण्याची इच्छाशक्ती त्यांच्याजवळ होती. काळ्या पाण्यासारख्या कारागृहाच्या अग्निदिव्यातून बाहेर पडणारी त्यांची प्रज्ञा सर्वस्पर्शी होती. सर्वगात्री, राजकारण, धर्मकारण, देवकारण, समाजकारण, कथा, कादंबरी, नाटक, कविता, निबंध, चरित्र, इतिहास लेखन, धर्मशुध्दी, भाषाशुध्दी, लिपीशुध्दी असे तिचे मूल्यगामित्व, क्रांतिकारत्व, अग्रलेख असलेल्या असंख्य पैलू असलेल्या, द्रष्ठ्याच्या जन्मदिनी स्वा. सावरकरांपुढे नतमस्तक होऊ या.

स्वा. सावरकरांना देव मात्र एकच माहीत होता आणि तो म्हणजे स्वातंत्र्य. ते स्तोत्र गात असत ते स्वातंत्र्य देवतेचे, स्वातंत्र्य देवतेला भगवती हे विशेषण लावत असत. ते आरती गायचे ते सुध्दा छ. शिवप्रभूंची म्हणजे एका महान स्वातंत्र्यवीराची, स्वातंत्र्यभक्‍ताची. राम आणि कृष्णा इतकेच सावरकरांना शिवप्रभू हे थोर आदर्श पुरुषोत्तम होते. राम-कृष्ण यांच्याकडे सावरकर पाहायचे ते स्वतंत्रता देवीचे सेनानी म्हणून. स्वातंत्र्य भक्‍तांच्या सेवकांचे ते पोवाडे गायचे. नरवीर तानाजी, बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची आणि चाफेकर बंधूंच्या बलिदानाची जात एकच होती.

हे ओळखून सावरकर त्यांचे पोवाडे गाण्यासाठी शाहीर बनले. रणात मरण पावलेल्या या स्वातंत्र्यवीरांना वैकुंठीच्या विमानाऐवजी स्वतत्रंता देवीचा रथ आला हे सांगणारी प्रतिभा सावरकरांचीच होय. चाफेकरांच्या फाशीतूनच माझा जन्म होत आहे. चाफेकर, रानडे आपल्या स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता जाता चेतावलेली ही शत्रुंजय वृती यज्ञकुंडात समिधेमागून समिधा ठाकून अशीच चेतवीत नेणे असेल आणि शेवट तो कोण्या प्रचंड स्वातंत्र्य युध्दाच्या महायज्ञात परिणीत करणे असेल तर त्याचे दायित्व माझ्यापुरते मजवरही पडत नाही का? असे ते म्हणत. चाफेकरांचे कार्य पुढे कुणीतरी चालविले पाहिजे ना? तर मग मीच का चालवू नये? ते काम मी ही का करु नये? माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युध्दात मारीत मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्यभिषेक करवीन. यापुढे माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारुन मारिता मारिता मरे तो झुंजेन. त्यांच्या रक्‍तात देशप्रेम इतकं भिनलं होतं की, सावरकर भायखाळ्याच्या तुरुंगात असताना त्यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी आली. तेव्हा सावरकर काथ्या कुटीत बसले होते. तेव्हा ते पत्नीला म्हणाले, हे असे आहे आमचे जीवन, काथ्याकुट जीवन, पुन्हा मरण, पुन्हा जीवन, काथ्याकुट, त्यांनी पत्नीला विचारलं, ओळखलं का गं मला? पत्नीला रडू आवरेना. सावरकर म्हणाले, अहो रडता काय?

अहो संसार सारेच करतात. मुला-मुलींची वीण वाढविणे व काही काटक्या एकत्र करुन घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे-चिमण्या देखील करतात. सावरकर जितके गंभीर तितकेच खोडकर आणि व्रात्यही होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. कधी कुत्र्याच्या पिल्लासारखे ओरडत. स्वयंपाक घरात कुत्रा कसा आला बरे म्हणून बायकांची घाबरगुंडी उडवत. दुपारच्या वेळेला घरातील महिला आरामासाठी पडल्या की तोच ३ भवति भिक्षां देही! म्हणून आरोळ्या ठोकीत. मोठ्या कष्टानं महिला उठून माधुकरी वाढायला आणीत. घरात मिश्किलपणे सावरकर हसत असत. लहर आली की, आरशासमोर अगदी वाकडं तोंड करुन बसत आणि वहिनीला विचारीत असत की, मी खरंच असा असतो तर आवडलो असतो का तुला? कधी डोक्यावरुन धोतराचा पदर घेऊन गणगौरीचं गाणं मुद्दाम बायकी आवाज काढून म्हणत. उखाणे घालून नाव घेत, रांगोळी काढीत, कागदाचे कातरकाम करीत, गाणी रचीत झोपाळ्यावर बसून भेंड्या खेळत असत. अशा या स्वातंत्र्य पुरुषाच्या स्मृतींना आमचे अभिवादन!

-विद्याधर ठाणेकर 

तरूण भारत (सोलापूर) २८ मे २००५

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..