नवीन लेखन...

भारतातील निसर्ग आणि विश्रांतीची पर्यटन स्थळे

निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. अशा या हिरवाईने नटलेल्या भारत देशात आपण जन्मलो हे आपलं भाग्यच! लांबच लांब पसरलेल्या हिमालय पर्वतरांगा, रांगडा सह्याद्री, त्याच्या कुशीत मनमुराद हुंदडणाऱ्या नद्या, त्या नद्यांना प्रेमाने आपल्यात सामावून घेणारे समुद्र, दूरवर पसरलेले वाळवंट हे सर्वच आपल्याला खुणावत असतात. […]

अशी कवीता येते

कृष्णासम ही नटखट अवखळ लाघवी कवीता हळूच पाऊली येते मयुरपिसी मखमली मृदुल करांनी अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ।।१।। कदंबतरुच्या साऊलीत या साक्षात बीज प्रतिभेचे फूलते शब्दफुलांच्या या वटवृक्षावर भावगंधले गीत कोकिळा गाते ।।२।। कालिंदीच्या! डोहातूनी त्या सुरेल, ताल सप्तसुरांची येते राधे! बघ सामोरी कृष्णमुरारी धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते ।।३।। शब्दशब्द मनी भाव उमलता वास्तव! […]

गणिती शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे उर्फ पां. वा. सुखात्मे

पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता. […]

ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा

सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. […]

मायमराठीचा भाषाप्रभू

‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ व ‘राजसंन्यास’ या पाच नाटकांतूनच राम गणेश गडकरी, हे किती थोर नाटककार होते हे समजते. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ७ )

गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली. […]

अतर्क्य! अगम्य! अनाकलनीय! (लेखांक क्रमांक १)

या अनाकलनीय अशा स्वरूपाचे वर्णन विष्णु सहस्रनामात केले आहे ते वर्णन सूक्ष्म स्वरूप व स्थूल स्वरुप आहे gravitational waves, पृथ्वी ते धृव यातील forces, waves याचं ही वर्णन अतिशय त्रोटक स्वरूपात आहे. जसे अतिसूक्ष्म quantum तसेच नवनवीन ब्राह्मण्ड गोल जे आपल्या सूर्यमालेतील ग्रह-तारे यांच्या 100 पट आहेत. कुठले देव ? कुठून आले वेद? […]

आभासी दुनियेत.. (माझी लंडनवारी – 25)

पुलंच्या अपूर्वाईमध्ये मी मादाम तुसाद बद्दलचे त्यांचे मत वाचले होते. त्यामुळे मला तशी फार अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख ही माझ्या वाट्याला आले नाही.आलोच आहोत तर, रॉयल परिवाराबरोबर फोटो घ्यावा म्हणून तिथे फोटो घेतला. […]

इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो

१९६५ ते ६८ या काळात कम्युनिस्टांचे सरकार सुहार्तोंनी लष्कराच्या बळावर उलथवले, तेव्हा तब्बल आठ लाख कम्युनिस्ट कार्यकर्ते वा समर्थकांना त्यांनी ठार मारले. त्यानंतरही पूर्व तिमूर, पापुआ व असेह भाग आपल्याच टाचेखाली ठेवण्यासाठी सुहार्तो यांनी लष्कराकरवी किमान तीन लाख जणांचे शिरकाण केले. […]

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट

डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटत असे. […]

1 5 6 7 8 9 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..