नवीन लेखन...

सोसायटीमध्ये अडचण आल्यावर तक्रार कोणाकडे कराल

बऱ्याचवेळा सदस्यांना त्यांच्या अडचणीबाबत कोणाकडे तक्रार करावी याची माहिती नसल्याने ते चुकीच्या दप्तरी पत्रव्यवहार करत राहून मौल्यवान वेळ वाया घालवत असतात. मागील लेखात तुम्हाला अधिमुल्य आणि हस्तांतरण बाबत माहिती मिळाली. परंतु सदस्याला कोणती अडचण असल्यास कोणत्या दप्तरी अर्ज करावा? सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी. […]

ऑईल स्पिल

वेक अप कॉल वाजल्यापासून आठ ते दहा मिनिटे झाले नव्हते की लगेच पुन्हा रिंग वाजली. तोंडातला ब्रश काढून घाईघाईत तोंड धुवून फोन उचलला तर पलीकडून मोटर मन म्हणाला जसे असाल तसे या खाली इंजिन रूम मध्ये ऑईल स्पिल झाले आहे. खाली जाताना चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि जुनियर इंजिनियर हे पण सगळे घाई घाईत पळत चालले होते. खाली जाऊन बघतो तर प्यूरीफायर रूम मधून काळे हेवी फ्युएल ऑईल दरवाजा बाहेर ओसंडून वाहत होते. […]

वडापाव

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महात्मा गांधींनी म्हटलं होतं, ‘परमेश्वराला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल, तर तो भाकरीच्याच रुपाने घ्यावा लागेल!’ आता ऐंशी वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे, आता भाकरी ही भुकेल्याला जीवनावश्यक असली तरी तिची जागा आता ‘वडापाव’ने बळकावली आहे. […]

संधिप्रकाशातील सावल्या…. एक नवी कोरी कथामाला…

आम्ही वृद्ध झालोत , पण टाकाऊ नाही झालोत . हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे . सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना ,त्याला संधिप्रकाश म्हणतात . आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते . ती अनुभवानं समृद्ध असते . त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल . जीवन कसं जगायचं हे आम्हाला , आमच्या सावलीला विचारा . सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला . आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही . बघ , तूच ठरव , म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? ” […]

जागतिक प्लास्टिक बॅग फ्री दिवस

प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते. […]

रोलिंग

सोमालियन पायरेट्सने केलेल्या अयशस्वी हल्ल्या नंतर आमच्या जहाजावर असणारे रायफलधारी सिक्यूरीटी गार्ड श्रीलंकेच्या ग्याले बंदरात उतरणार होते. सोमालियन पायरेट्सने दिवसा ढवळ्या जहाजाला हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. पण जहाजावर ए के 47 रायफल हातात घेऊन उभे असलेले सिक्यूरीटी गार्ड बघून पायरेट्स जास्त वेळ व त्यांची शक्ती खर्च न करता माघारी फिरून गेले होते. […]

‘इस्त्री’ ची घडी

पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी. […]

आज ती भेटणार होती

आज ती भेटणार होती दोन अडीच महिन्यानंतर मध्येच बरेच काही घडून गेले होते, त्या कोरोनाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते, […]

1 203 204 205 206 207 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..