नवीन लेखन...

 व्यर्थ झगडे

सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जातपात   ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण   ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला   ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून   ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण   ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत   ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता   ।। डॉ. भगवान नागापूरकर […]

विहीण की मैत्रीण (कथा)

अहो आई आणि ए आई हा फरक तसा नेहमीच राहतो. तरीही या काळातील अहो आई आणि ए आई असा फरक मुलींसाठी तसा कमीच झाला आहे. या लाॅकडाऊनच्या मिळालेल्या वेळेमुळे तो अजून कमी झाला असेल. अशी अपेक्षा आहे.  […]

निरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा

गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु… […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २६

यदापारमच्छायमस्थानमद्भि- र्जनैर्वा विहीनं गमिष्यामि मार्गम् | तदा तं निरुंधंकृतांतस्य मार्गं महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ ‖ २६ ‖ यमलोकात गेल्यावर प्राप्त होणाऱ्या यातना देहाचा विचार आल्यानंतर स्वाभाविकच आचार्यश्री त्या यमलोकाचा प्रवासाचा विचार आपल्या समोर मांडतात. किती कष्टदायक आहे हा मार्ग? आचार्य श्री म्हणतात, यदा – ज्यावेळी, त्या यमराजाचे दूत माझे प्राण हरण करून नेतील, अपारम् – प्रचंड […]

 लोपलेले श्रेष्ठत्व

डोळे उघडून बघा तुम्हीं    आपल्या देशाला  । महानतेची परंपरा    दिसेल तुम्हाला  ।। जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी    नाव होते त्याचे  । आज विसरलो महत्त्व सारे    आपल्या पूर्वजांचे  ।। दोष असेल त्यांचा कांहीं    सोडून  द्यावा  ।। परि अभिमान हा परंपरेचा   मनात ठेवावा  । डोळ्यांनी जे बघतो सारे    सत्य  समजता  ।। कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे    चूक  ठरविता  । कित्येक गोष्टीची उकलन होती   वेदामध्ये आपल्या  ।। परि पुराणातील वांगी समजूनी    फेकून त्या दिल्या  । आमचे जवळील ज्ञान गंगाजळ    आम्ही  विसरतो  ।। परकियांची कास धरूनी    वाट  भटकतो  । ते तर आहे महाठगते     वेद नेई चोरूनी  ।। पिऊनी आमचीच ज्ञान गंगा    चाले मान उंचावूनी  । विचार करावा थोडा याचा    शांत चित्ताने  ।। […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २५

यदा यातनादेहसंदेहवाही भवेदात्मदेहे न मोहो महान्मे | तदा काशशीतांशुसंकाशमीश स्मरारे वपुस्ते नमस्ते स्मराणि ‖ २५ ‖ मानवाच्या अंतिम अवस्थेचे विविधांगी वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज त्यातील एकेका पैलूला आपल्यासमोर ठेवत आहेत. येथे देहासक्ती बद्दल बोलताना आचार्य श्री म्हणतात, यदा – ज्यावेळी, अर्थात जेव्हा माझा अंत समय येऊन पोहोचलेला असेल त्यावेळी, यातनादेह- आचार्यश्रींनी योजिलेला हा […]

तुला लाभलेली निसर्ग देणगी

खळी पडून गालावरी   सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी    मधूर तूं हांसते  ।।१ इवले इवले ओठ      फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे   भुर भुर उडती मानेवरी   ।।२ मोत्यासारखे दांत भासे   कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे   तुझ्या डोळ्या  ।।३ इंद्रधनुष्याचा बाक      दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली   नाकाला  ।।४ चमकते अंगकांती    फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी   तुझ्या गरीबीतूनी  ।।५   […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २४

यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मान् अयं श्वास एवेति वाचो भवेयुः | तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं पुरारे भवंतं स्फुटं भावयेयम् ‖ २४ ‖ अंतिम तारक असणाऱ्या भगवान शंकरांच्या त्याच स्वरूपाला वेगवेगळ्या अंगाने आळवतांना आणि आपल्यासमोर स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी माणसाच्या अंतिम समयीच्या अवस्थेचे विविध पैलू आधारभूत मानले आहेत. आचार्यश्री म्हणतात, यदा पश्यतां माम्- ज्यावेळी मला पाहणारे, अर्थात त्या अंतिम […]

मनाचे रंग . ..प्रेमभंग ! (नशायात्रा – भाग ४४)

मी अगदी टिपेच्या स्वरात ‘ मेरे नैना सावन भादों ‘ हे गाणे म्हणत होतो , आवाजही मस्त लागला होता माझा , गाण्याच्या बाबतीत माझा ऐक नेहमीचा अनुभव सांगतो , कदाचित प्रत्येक गायकाला हा अनुभव येत असावा , जेव्हा अगदी तल्लीन होऊन गाणे म्हंटले जाते , गाण्यातील शब्द , सूर व गळा हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा […]

मला उमगलेला पाऊस

पाऊस कधी मला समजलाच नाही. किचकीचणाऱ्या डबक्यात, मिचमीचणाऱ्या दिव्यात कडाडणाऱ्या ढगात कसला आलाय रोमांच. पण झुलणाऱ्या पानांत मातीच्या तहानलेल्या सुवासात निरागस टपोऱ्या थेंबांत पाऊस कधी मी बघितलाच नाही. आणि जेव्हा उधळली बरसात गहिऱ्या प्रेमात अबोल स्पर्शात मनातल्या वादळात गच्च डोळ्यांत, पाऊस तेवढा चांगला पुन्हा कधी मला समजलाच नाही. — कल्याणी 

1 10 11 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..