नवीन लेखन...

मनाचे रंग . ..प्रेमभंग ! (नशायात्रा – भाग ४४)

मी अगदी टिपेच्या स्वरात ‘ मेरे नैना सावन भादों ‘ हे गाणे म्हणत होतो , आवाजही मस्त लागला होता माझा , गाण्याच्या बाबतीत माझा ऐक नेहमीचा अनुभव सांगतो , कदाचित प्रत्येक गायकाला हा अनुभव येत असावा , जेव्हा अगदी तल्लीन होऊन गाणे म्हंटले जाते , गाण्यातील शब्द , सूर व गळा हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा गाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर हलकेच रोमांच उभे राहते व ही खुण असते गाणे सुंदर होतेय याची , गायकाला स्वतःलाच जाणवते की गाणे मस्त म्हणतोय आपण ते, कदाचित श्रोत्यांना देखील अश्या वेळी एकाग्रतेने गाणे ऐकताना त्या गाण्यातील शब्दांशी एकरूपता साधली गेली की असेच होत असावे . . अगदी तसेच झाले होते माझे त्यावेळी . गाणे संपले सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला . अजून एकदोन गाणी म्हणण्याचा आग्रह झाला मला , नंतर मग तेथे जमलेल्या पैकी एका स्त्रीने मला माझे नाव वगैरे विचारले व सांगितले की मी तुझ्या आई वडिलांना ओळखते त्या स्त्री चे पती देखील रेल्वेत होते त्यांनी मला घरात बोलावले .

ती रोखून पाहणारी मुलगी याच घरातली होती , त्यांना एकूण तीन मुली त्यापैकी ही मधली इयत्ता सहावीत होती , मोठी माझ्याच वयाची आठवीत होती तर धाकटी पाचवीत . तिन्ही मुली दिसायला एकदम छान होत्या , माझ्या रोखून पाहणाऱ्या मुलीचे नाव सुमा होते . माझी त्या कुटुंबाशी ओळख झाली आणि त्यांनी मला परत दुसऱ्या दिवशी ये इकडे असे म्हंटले , मला ते आवडले, सुमा नाकेली ,उंच , गोरी , एका वेणीचा शेपटा घातलेली होती ती काही बालली नाही मात्र तिचे डोळे खूप काही सांगत होते . उन्हाळ्याच्या सुट्या सुरु असल्याने मग सतत त्यांच्याकडे जाऊ लागलो त्या तिन्ही मुलींशी चांगली मैत्री झाली माझी त्या भागातील माझा मित्र दिलीप होता त्याच्या तेथील मित्रांशी देखील ओळख झाली माझी , मग मी सर्व सुट्टीत खेळण्यासाठी त्या इमारतीत जाऊ लागलो , लपाछपी, जोडीची शिवाशिवी ,कँरम , पत्ते असे खेळ आम्ही खेळत असू आणि ऐक खेळ नेहमीचा झाला होता तो फक्त सुमाला न मलाच माहित होता नजरेचा खेळ , तसे आम्ही लहानच होतो पण सिनेमा वगैरे पाहून थोडाफार शहाणपणा आला होता या बाबतीत व जाणवत होते की सुमाला मी आवडतो व मलाही ती आवडत होती , ज्या ज्या खेळत दोन गट पाडावे लागत असत त्या खेळात ती नेहमी माझ्या बाजूने येत असे , मलाही सारखे तिच्याशी बोलावे , तिला हसवावे , असे वाटत होते . ऐरवी मी अंगावरच्या कपड्यानबाबत फारसा जागृत नसे पण आता मला नीटनेटके रहावेसे वाटू लागले .

माझ्या आईकडे जेव्हा मी सुमाच्या कुटुंबां बद्दल उल्लेख केला तेव्हा आई म्हणाली की ‘ मी ओळखते त्या काकुना , क्वचित हळदीकुंकू वगैरे निमित्ताने आईची व त्यांची भेट होई , ती उन्हाळ्याची सुट्टी जरा लवकरच संपली माझी आणि शाळा सुरु झाली तेव्हा माझे सुमाच्या घरी जाणे जरा कमी झाले , मात्र शाळेत जाता येताना सुमा दिसत असे , तिची शाळा र . ज बिटको गर्ल्स हायस्कूल आमच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल च्या समोरच होती . जेव्हा जेव्हा आमची नजरानजर होई तेव्हा आम्हाला एकमेकांकडे पाहतच रहावेसे वाटे वळणावर आल्यावर ती मागे वळून पाहतेय का हे बघण्याचा छंद लागला मला आणि तिलाही . मनात सारखी तिला बघण्याची ओढ वाटू लागली .. कदाचित हेच प्रेम असावे असे मी समजलो .. ती रस्त्यात कधी माझ्याशी बोलत नसे फक्त समोर आलो की ऐक जीवघेणे स्मित करीत असे , मात्र तिच्या घरी मी गेल्यावर खूप बोलत असे माझ्याशी .. पाहता पाहता दिवस संपत होते . रेल्वे क्वार्टर्स मधील माझ्या इतर अवांतर गोष्टी सुरूच..ज्यात माझा आडदांड पणा , मस्ती , खोड्या , मारामाऱ्या वगैरे सुरूच होत्या , अव्यक्त अशी सुमाबद्दल असलेली ओढ काही केल्या मला प्रत्यक्ष तिच्याकडे व्यक्त करण्याची हिम्मत होत नव्हती व ती देखील फक्त नजरेनेच मला प्रतिसाद देत होती , बाहेर मित्रांमध्ये कोणालाही न घाबरणारा , आक्रमक , अश्या प्रवृत्तीचा मी असलो तरी सुमा समोर आली की मी एकदम मऊ होत असे , पाहता पाहता मी दहावी पास होऊन अकरावीला गेलो , व माझे सिनेमा बघण्याचे वेड वाढले त्या बद्दल मी मागील एका भागात लिहिलेच आहे . अकरावीला मी सिगरेट देखील ओढू लागलो होतो . चक्क नापास झालो . ..

एकदा तर गम्मतच झाली , मी अनुराधा थेटरला मित्राबरोबर सिनेमा पाहायला गेलो होतो व मध्यंतरात बाहेर थेटरच्या कंपाऊंड पाशी उभा राहून सिगरेट ओढत होतो , सुमाचा क्लास हून घरी जाण्याचा रस्ता थेटर समोरूनच जात होता .मी दूर रस्त्यावर ती घरी येताना दिसते का ते पाहत होतो , मी सिगरेट तोंडात घेऊन झुरका मारणे आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या सुमाला मी दिसणे ही एकच वेळ आली तोंडातील सिगरेट घाई घाई ने बाजूला करेपर्यंत व्हायचे ते झालेच होते .तेव्हापासून बिनसायला सुरवात झाली … सुमाला मी नेमकी काय चीज आहे ते समजले होते आणि त्याकाळी असे सिगरेट ओढणे वगैरे आजच्या सारखे लोकमान्य झालेले नव्हते . सुमाचे वडील चेनस्मोकर होते व कदाचित तिला सिगरेट श्रचा तिटकारा असावा..त्या दिवसापासून तिचे वागणे जरा बदलले तिच्या घरी गेल्यावर ती माझ्याशी फारशी बोलेनाशी झाली ..

मी देखील मुर्खासारखा सिगरेट पिणे सोडून देण्याएवजी इतरही व्यसनात अडकत गेलो आणि वर सुमाचे असे तुटक वागणे ऐक व्यथा बनवून त्यात बुडत गेलो . पुढे सुमा बिटको कॉलेज ला आली तेव्हा देखील ती अनेक सूचक शब्दांनी मला सगळे धंदे सोडून शहाण्या मुलासारखे वागावे हे सांगत गेली पण तो पर्यंत माझी केस हाताबाहेर गेली होती . तिच्या वर्गातील ऐक मित्र आम्ही गांजा , ब्राऊन शुगर वगैरे ओढतो या बातम्या तिच्या पर्यंत पोचवत असावा बहुतेक त्यामूळे सगळेच फिस्कटत गेले . एकदाच ती मी जेव्हा ब्राऊन शुगर मध्ये अडकलो तेव्हा मला म्हणाली कशाला हे सगळे करतोस ? चांगले नाही . त्यावर मी उद्यापासून बंद करतो असे म्हणालो ..मात्र स्वतःशी प्रामाणिक नसल्याने मला ते पाळता आले नाही . सुमा माझ्या साठी ऐक वेदना बनून राहिली दोष माझाच होता तरीही मी काही व्यसनातून योग्य वेळी बाहेर पडू शकलो नाही आणि वर प्रेमभंग झाला म्हणून अधिकच हळवा होत गेलो .

‘मेहबुबा ‘ सिनेमातील ‘ मेरे नैना ‘ या बाजूच्या थेटर मधून ऐकू येणाऱ्या गाण्याने माझ्या सुमा बद्दलच्या सर्व स्मृती उफाळून आल्या खूप अवस्थ झालो , कसेही करून एकदा तरी सुमाला डोळे भरून पहावेसे वाटू लागले ताबडतोब मागचा पुढचा विचार न करता माझी तब्येत खूप बिघडल्याचे सांगितले आमच्या टीम च्या मँनेजरला आणि मी घरी परत जातो असे सांगून रात्री ११ वा ,खामगाव स्टेशनवर आलो तेथून नासिक कडे जाणारी रेल्वे सुमारे ३ तास लेट होती म्हणून मग मनमाड पर्यंत जाणाऱ्या गाडीने मनमाड ला पोचलो , तेथून बसने नाशिक गाठले , आधी अड्ड्यावर जाऊन ब्राऊन शुगर घेतली , आणि संडासात असून ब्राऊन शुगर पीत चेसिंग करत माझे दुखः कुरवाळत बसलो नंतर कॉलेजला गेलो सुमाला एकदा डोळेभरून पाहायला .

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..