नवीन लेखन...

भ..भू .. भूत भूत ! (नशायात्रा – भाग ७)

अय्युबला एकदा झटका दाखवल्यानंतर स्टेशन वाडी , सिन्नर फाटा , विष्णू नगर भागात माझा चांगलाच बोलबाला झाला होता व आता तोंडओळख असणारे मला आवर्जून नमस्कार करू लागले होते तसेच तोंडावर तुषार भाऊ असे संबोधू लागले होते आणि पाठीमागे डेंजर बामण हे होतेच . गणपती उत्सव , नवरात्र , होळी , रंगपंचमी असे सण म्हणजे मजाच मजा असे मस्ती , मस्करी , किरकोळ भांडणे , खोड्या हे असायचेच . विशेषतः ‘ होळी ‘ ची तयारी एक आठवडा आधीपासून सुरु व्हायची , लोकांकडे गोवऱ्या , लाकडे यासाठी वर्गणी मागणे , रात्रीच्या वेळी आसपास बेवारस पडलेली किवा मालकचे लक्ष नसलेली लाकडे उचलून आणणे , प्रत्यक्ष होळी पेटल्या पासून रंगपंचमी पर्यंत ५ दिवसात होळी सतत धगधगती ठेवण्याची जवाबदारी आमचीच असे ..

रात्री २ ते ३ वा . पर्यंत आमची टोळी लाकूडचोरी साठी जागत असे, एव्हाना कुटुंबियांनी मला बोलणे सोडले होते कारण बोलून त्याचा काही परिणामही होत नसे , तसेच रेल्वे क्वार्टर्स मधील तुरळक ब्राह्मण मित्रांनी माझी मैत्री सोडली होती ( कदाचित घरून त्यांना तशी समज मिळाली असावी ) . आम्ही पेटत्या होळी जवळ बसून रात्री उद्योग करत असू , लाकडे चोरून आणणे , जे लोक वर्गणी देत नाहीत अश्या लोकांच्या दाराला बाहेरून कड्या घालणे , एखाद्या भांडखोर व्यक्तीच्या घरावर दगडफेक करणे वैगरे सामाजिक उपद्रव चालत असत….

त्याच वेळी नाशीक रोड ला ‘ रेजिमेंटल ‘ थेटर मध्ये ‘ कब ?क्यू ?कहा ? ‘ हा हॉरर चित्रपट लागला होता त्यात प्राण हा खलनायक आहे आणि तो एका सीन मध्ये उताणा झोपलेला असताना एकदम यंत्रवत पद्धतीने उठून उभा राहण्याचा एक अतिशय परिणाम कारक प्रसंग आहे , चित्रपट पाहताना लोक घाबरतात तो प्रसंग पाहून , आमच्यातील एक ते तसे यंत्रवत उठून उभे राहणे शिकला होता . एकदा रात्री होळी जवळ बसलो असताना त्याने ते करून दाखवले अगदी हुबेहूब , आता कोणाला तरी घाबरवता येईल हा विचार सगळ्यांच्या डोक्यात आलाच , गल्लीतील सुधाकर नावाचा एक सरळ मुलगा नेमका त्याच दिवशी रात्री ‘ कब , क्यू , कहा ? पाहण्यास गेला आहे ही माहिती एकाने पुरविली सुमारे साडेबारा वाजत होते म्हणजे सिनेमा सुटला असणार व सुधाकर चा घरी जाण्याचा रस्ता जेथे होळी पेटते तेथूनच होता , प्लान ठरला आणि आम्ही सर्व आसपास लपलो फक्त होळी जळत होती आणि होळीजवळ तो प्राण ची नक्कल करणारा उताणा अंगावर कांबळे घेऊन पडला होता सुधाकर येण्याची चाहूल लागली तसे शिटी वाजवून इशारा दिला आणि तो मुलगा हळूच उठून उभा राहिला इकडे सुधाकरची बोबडी वळलेली , भ ..भू .भूत असे म्हणत तो पळत सुटला…

नंतर सुधाकर ५ दिवस आजारी होता तो झोपेत उठून पळत असे , बडबडत असे , सतत ताप चढलेला . आमची मस्करी त्याच्या जीवावर बेतली होती , आम्हाला खूप अपराधी वाटत होते पण ही मस्करी आम्ही केली हे सांगणे म्हणजे सर्वांवर संकट ओढवून घेणे , तेथे स्टेशन वाडीत एक लक्ष्मण नावाचा मांत्रिक होता , मानेपर्यंत वाढलेले केस , काळा कुळकुळीत रंग , गळ्यात कवड्यांच्या मला असे उग्र ध्यान होते लक्षमण चे , सुधाकरच्या घरातील लोकांनी त्याला ‘ लक्षमण कडे नेले , लक्षमण ने जरा फुकफाक करून सुधाकर ला भुताने धरल्या चे जाहीर केले आणि मग काही पैसे घेऊन एक कोंबडी सुधाकर वरून उतरवली . सुधाकर चक्क बरा झाला ,. तेव्हापासून लक्ष्मण चा मान खूप वाढला त्या भागात .

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..