बेंगलोरमधली खवय्येगिरी

मला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं. […]

आज्जीची माया

खूप सुंदर असतं घरात आज्जी असणं. घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. तिच्या पदराआड दडलं की कसं सुरक्षित वाटतं. वेगळेच संस्कार होतात मनावर तिच्यासोबत असलं की. तुम्ही चुकलात तर प्रेमाने तुम्हाला ओरडेल, रोज संध्याकाळी देवासमोर बसून शुभंकरोती म्हणवून घेईल, मनाचे श्लोक पाठ करून घेईल, लाडू वळले की पहिला तुम्हाला देवासमोर ठेवायला लावेल आणि दुसरा तुमच्या हातात देइल, तुमचा हात हातात घेउन मंदिरात नेइल आणि तुम्ही परत निघताना निरोप घेत तुमचा गोड पापाही घेईल. […]

मला उमगलेला पाऊस

पाऊस कधी मला समजलाच नाही. किचकीचणाऱ्या डबक्यात, मिचमीचणाऱ्या दिव्यात कडाडणाऱ्या ढगात कसला आलाय रोमांच. पण झुलणाऱ्या पानांत मातीच्या तहानलेल्या सुवासात निरागस टपोऱ्या थेंबांत पाऊस कधी मी बघितलाच नाही. आणि जेव्हा उधळली बरसात गहिऱ्या प्रेमात अबोल स्पर्शात मनातल्या वादळात गच्च डोळ्यांत, पाऊस तेवढा चांगला पुन्हा कधी मला समजलाच नाही. — कल्याणी 

मी आणि चंद्र

रात्रीची आल्हाददायक झुळूक हळूच मला खुणावते आणि मी नकळत तुझ्याकडे वळते. आणि तुझ्या शीतल छायेत आल्यावर माझ्या अंगावर चांदण्याची फुलं बिनधास्त उधळतोस तू.. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..