नवीन लेखन...

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे    कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे    जे सबळ समजती  ।।१।। विचार मनी येतां     दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां    हार तुमची झाली ।।२।। मनाची सबलता    हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह    दुर्बल असतां मन ।।३।। सुदृढ देह व मन     यांची मिळून जोडी जीवनातील यश    तुमच्या पदरीं पाडी ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदर

सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता. समोर एका छोट्याशा बेटावर एक टुमदार किल्ला दिसत होता. त्याच्यावर बहुधा फ्रान्सचा नौसेना किंवा सैनिक तळ असल्याचे दिसत होते. किल्ला अत्यंत मजबूत आणि सुस्थितीत होता तसेच त्याच्यावर चारही बाजूला तोफा दिसत […]

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे,  पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती,  काव्य रचना करूनी जाती  ।। अवचितपणे विचार येतो,  भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी,  पद्यरूप जातो देऊनी  ।। सतत वाटते शंका मनी,  हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती,  माझे कडूनी करवून घेती  ।। तळमळ आता एक लागली,  जाणून […]

निरोप

तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम देवा तिजला दूरवर बघत राहीन ती लेकीला लेक चालली निरोप घेवूनी सासरी भरल्या नयनी माय उभी शांत दारी जड पावले पडता दिसती लेकीची ओढ लागली त्याच पावलांना मायेची उंचावूनी हात हालवीत चाले  लेक जलपडद्यामुळे दिसे तीच अंधूक वाटेवरूनी जाता जाता दृष्टीआड झाली अश्रूपूसून पदराने माय घरात आली दूर गेले पाखरू ते आकाशी उडून […]

विचार आतला…

विचार आतला, काळोख दाटला, उजळत्या घरां, आत्मा पाहिला,–!!! चिंता दु:खे, बोचरी सुखे, विलक्षण खंता, हृदयाला भिडतां,–!!! मी तूपणा गळतां, अंतरात्मा छळता, प्राणातील परमात्मा, मोक्ष मागतां,–!!! जीव सुटेना, कर्मात,भोगात, अडकून राहिला, दार उघडतां,–!!! मुक्काम बदलतां, नसते हातां, व्यथा हृदयां, जिवा छळतां,–!!! स्वर्ग-नरक, कल्पना नुसत्या, माणसांच्या वस्त्या, नकोशा-नकोशा,–!!! © हिमगौरी कर्वे

तो.. ती.. आणि मी !

तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान. सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर . तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट. …आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद […]

मतदान नव्हे मताधिकार

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही. […]

आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही,  कौतूक त्याचे सारे करतील स्तुती सुमनातील भाव जमूनी,  हृदयामधले दालन भरतील….१ उचंबळूनी जाशील जेव्हां,  बांध फुटेल नयनामधुनी ओघळणारे अश्रू सांगतील,  भाग्य तुझे ग आले उजळूनी….२ दरवळू दे सुंगध सारा,  नभांत जातील यश तरंग स्वर्गांमधुनी  ‘भावू ‘बघतील  भीजव त्यांचे सारे अंग…३   (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)   — डॉ. भगवान […]

अजब न्याय नियतीचा – भाग २८

आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अ‍ॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले.  सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.  […]

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  चित्त चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंताचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असूनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

1 8 9 10 11 12 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..