नवीन लेखन...

देवा वाचव माझ्या देशाला व जनतेला

*देवा वाचव या देशाला व समाजाला या……………पासुन* सर्व पत्रकार बांधवांस, सप्रेम नमस्कार पत्रास कारण कि, कमाल वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला मंत्र्याने दिलेली उद्दाम वर्तणूक पाहिली. मंत्री चुकलेच, पण माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. संबंधित मंत्री जे काही बोलले तो प्रसंग चुकीचा असला तरी त्यांनी जे काही सांगितले ते […]

आज ७ ऑगस्ट – नागपंचमी

आज ७ ऑगस्ट, नागपंचमी 1. नाग/साप कधीही दूध पीत नाही, कारण तो सस्तन प्राणी नाही. 2. नाग जिभेने वास घेतो, त्यामुळे तो सारखी जीभ बाहेर कडून आसपास असणाऱ्या प्राण्यांचा अंदाज घेतो. 3. नाग पूर्ण मांसाहारी प्राणी आहे, तो इतर प्राण्यांची अंडी, किंवा लहान प्राणी, जसे उंदीर, बेडूक, सारडा यांना खातो. 4. त्याची स्मरण शक्ती अतिशय अल्प […]

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करीत  । लक्ष्य त्यांचे फूलपाखरू, फुलाभोवती होते खेळत ।।१।।   भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी  । शोषीत असता गंध फुलांतील, चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।   व्याघ्र मावशी मनी  , म्याँव म्याँव करीत आली  । उंदीर मामा दिसता तिजला, झेप घेण्या टपून बसली ।।३।।   शंका येता त्याला […]

एक विचार

‘दगड’ ‘दगड’ म्हणजे ‘देव’ असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो. अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो. हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो. घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो. स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो. मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो. कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव […]

नागपंचमी

श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा करतात.हे एक व्रतसुद्धा आहे. व्रतामध्ये श्रावण शुद्ध चतुर्थीला एकभुक्त राहून पंचमीचे दिवशी पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढून त्यांच्यासोबत नागपत्यांचे सुद्धा चित्र काढतात. त्यानंतर संकल्प करून नागाची पूजा करतात. नागाला दूध -लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. नागपंचमीला अखिल भारतीय महत्त्व आहें. भारतात सर्वच भागात […]

चला देवगडला, पावसाला कडकडून भेटायला..

‘देवगडचा पाऊस’ हा माझा लेख वाचून माझ्या अनेक परिचितांनी देवगडला भिजण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली.. मलाही तुम्हाला घेऊन जायला खुप खुप आवडेल..इथे पावसाळ्यात जायलाच हवं..पण त्यासाठी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.. सर्वात महत्याचं म्हणजे उरात प्रचंड हौस हवी. ह्या अटीला ऑप्शन नाही.. देवगडचा पाऊस मनमुराद एन्जॉय करायचा असेल तर सुट्ट्यांचा बळी द्यायची तयारी हवी..किमान दोन […]

नितीन गडकरी आणि Route 66

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेला मुंबई –पुणे एक्सप्रेस वे तयार झाला आणि नितीन गडकरी या माणसाकडे लक्ष गेले. आजही त्यांच्या शिरावर संपूर्ण देशाचे रस्ते बांधण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली ती त्यांचे मुंबई–पुणे या रस्त्याचे काम पाहूनच.महाड -पोलादपूरचा ब्रिटिश कालीन पूल कोसळल्या नंतर जी विधान सभेत चर्चा झाली त्याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्या दाखवत होत्या . सरकार मधील कुणीही ” हो या अनर्थाची जबाबदारी आमची आहे” असे स्पष्ट पणे म्हणत नव्हते. पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्गार ऐकले आणि जरा बरे वाटले. […]

मोबाईलला मित्र करा.. पण सावधपणेच ..

मोबाईल फोन हातात नसणारा माणूस आजकाल विरळाच ! फोनचे मुख्य काम संवाद आणि संपर्काचे, पण त्याचा आता वापर होऊ लागलाय चक्क खेळण्यासाठीसुद्धा. अगदी दोन-दोन वर्षानी मोबाईल बदलणारे लोक जसे आहेत तसे अक्षरश: सहा महिन्यातही मोबाईल बदलणारे लोकही आपल्या आसपास दिसतात. नवा फोन घेतला की जुना फोन घरातल्या दुसर्‍या व्यक्तीला दिला जातो तसाच कधीकधी बच्चेकंपनीला खेळण्यासाठीही दिला […]

स्मृती कारगिल युद्धाच्या

२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ […]

मानसिक आजार आणि शारीरिक दुष्परिणाम

शरीराशी संबंधित गोष्ट ही केवळ शरीराशी संबंधित असते असं नसून तीचा मनाशीदेखील संबंध असतो. ताप आला की आपण किती अस्वस्थ आणि चिडचिडे होतो ते आठवा माझा मुद्दा लगेच पटेल!! याच पद्धतीने मानसिक आजारदेखील शारीरिक दुष्परिणाम करत असतात असा या दोघांचा निकटवर्ती संबंध आहे. […]

1 11 12 13 14 15 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..