नवीन लेखन...

श्रावणी (उपाकर्म)

श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो. श्रावणी […]

श्रावण मासातील वार विशेष

रविवार – श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ति नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे असेही शास्त्रात सांगितले आहे. सोमवार – श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुष्ठि नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी […]

श्रावण महिना

या महिन्याचे पौर्णिमेच्या आजूबाजूला श्रवण नक्षत्र येत असल्याने या महिन्याला श्रावण असे म्हणतात. या महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. या महिन्यात दररोज कोणते ना कोणते व्रत सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना चातुर्मासांत येत असल्याने सध्या अनेक लोक संपूर्ण चार महिने नियम पाळणे शक्य होत नसल्याने या महिन्यापुरते तरी नियम पाळतांना आढळतात. […]

स्मृतिकाव्य : तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो

संभ्रम तुझ्या हंसण्याचा नित काळजास होतो तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो ।। १ हलकीशी झुळूक गंधित अंगावरून जाई कुठुनी हा सोनचाफा उधळत सुगंध राही ? स्मृतिचा, मनात माझ्या अविरत सुवास होतो ।। २ मज कोण बोलवी हें , कां नेत्र ओलवी हे ? कंठात हुंदका कां दाटुन उगीच राहे ? संसर्ग विकलतेचा, आहत-मनास होतो ।। ३ […]

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  […]

समाधानाची बिजे

दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती   धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा   देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे   भावनेमधली विविध अंगे येऊं लागली […]

भारतातील स्तन्यपानसंबंधी सद्यपरिस्थिती

आपल्या तान्हुल्याची भूक भागवणाऱ्या त्या मातेला सभोवताली असलेल्या आणि बहुतेक वेळा तिरक्या नजरेने तर कित्येकदा थेट पाहणाऱ्या विकृत व्यक्तींचा. अशा प्रवृत्ती समूळ नष्ट होणे शक्य नाहीच पण किमान त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. […]

टिप्पणी : ७ : ये कहाँ जा रहे हम ?

बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार * स्त्रियांचे समाजातील unequal स्थान संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या . • सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. […]

गणपति : विज्ञानयुगीन उकल : विघ्नेश व विघ्नहर्ता

अथर्वशीर्षात गजाननाबद्दल, रक्तिम-वस्त्रे-परिधान-केलेला, रक्तगंधानें-लिप्त-अंग असलेला, रक्तपुष्प-पूजित असे उल्लेख आहेत. गजाननाला रक्तवर्ण (लाल रंग) प्रिय आहे, असे अन्यत्रही उल्लेख आहेत. असें कां बरें ? याचें उत्तर पुरातन वाङ्मयानेंच दिलेले आहे. त्यात उल्लेख केलेला आहे की, गजानन हा आरंभीच्या काळात ‘विघ्नेश’, ‘विघ्नकर्ता’ होता; आणि नंतर त्याचें ‘विघ्नहर्ता’ हें रूप प्रचलित झाले. अरेच्चा !! पण इतका उलटा बदल कसा […]

स्तन्यपानाचे महत्व – भाग १

संपूर्ण जगाला स्तन्यपानाचे महत्व सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने आणि पर्यायाने हिंदुस्थानाने. आज त्याच देशात #BreastfeedIndia असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे. […]

1 13 14 15 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..