नवीन लेखन...

टिप्पणी : ७ : ये कहाँ जा रहे हम ?

बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार
* स्त्रियांचे समाजातील unequal स्थान
संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या .

• सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. ( या , प्रवेश नाकारण्याबद्दल, व स्त्री-पुरुष असमानतेबद्दल मी आधी एक लेखही लिहिलेला आहे, जो वेबसाइटवर वाचतां येईल).

अशा सततच्या बातम्यांमुळे मनात अतिशय अस्वस्थता येते, आली आहे. म्हणून, ही पोटतिडीक, ही टिप्पणी.

• ध्यानात राहूं द्यावें की, आपण या प्रश्नाचा ऊहापोह, धार्मिक बाब म्हणून करणार नसून, एक महत्वाची सामाजिक बाब या अर्थानेंच करीत आहोत.

• तथाकथित ‘खालच्या’ जातींना ‘सापत्न’ वागणूक देतांना आपण Dignity of Labour चा विचार करत नाहींच ; पण आपण हाही विचार करत नाहीं की, या लोकांनी शतकानुशतकें समाजाला ज्या ‘सेवा’ (services) दिल्या, त्या जर दिल्या नसत्या, तर समाज सुचारु रूपानें चालूं शकला असता कां ? समाजाच्या एका महत्वाच्या भागाला आपण बाजूला ठेवतो, दूर लोटतो आहोत , याचें भान या समाजाला नाहीं कां ?

• बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन कां केलें, याचा सखोल विचार आपण कधी करणार ? सुदैवानें त्यांनी बौद्ध धर्मासारखा शांतिपूर्ण धर्म स्वीकारला. बरीच वर्षें मनन-चिंतन करून, राष्ट्राच्या ऐक्याचा विचार करून, त्यांनी हेतुत: हाच धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हें आपले भाग्यच ! पण या घटनेपासून आपण कांहीं शिकलो कां ? आपली ‘दकियानूसी’ वृत्ती बदलायचा प्रयत्न तरी केला कां? की आपले, ‘पहिले पाढे पंचावन्न’ ?

• आतां , सएमाजातील घटकांच्या असमानतापूर्ण वर्तणुकीला कंटाळून एका गावातील ३०० दलित कुटुंबें धर्मांतर करायचें ठरवत आहेत. त्यांना कसा दोष द्यायचा ? त्यांच्या स्वत:च्या धर्मातील तथाकथित ‘उच्चवर्णी’, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांना ‘खालचे’, दुय्यम ठरवून, त्यांचे न्याय्य अधिकार नाकारत आहेत. या ‘सो-कॉल्ड् उच्चवर्णीयांना’ हें कळत नाहीं की, मध्ययुगात असेच अनेक लोक परधर्मात गेले आहेत. दर वेळी त्यांच्यावर कुणी सक्ती केली असेलच असें नाहीं, दर वेळी धर्मांतरासाठी कोणी त्यांना लालूच दिली असेल असेंही नाहीं. शतकानुशतकें झालेल्या या धर्मांतराचें प्रमुख कारण, स्वधर्मांमधील लोकांची वर्तणूकच होती. याची अनेक उदाहरणें देतां येतील. जिना यांचे पूर्वज (आजोबाच) हिंदू होते, पण त्यांनी सुरूं केलेल्या धंद्यावरून त्याना ‘वाळीत’ टाकलें गेलें होतें ; त्यामुळे त्यांनी धर्म बदलला. नंतर त्यांना पश्चात्ताप झाला, व स्वधर्मात परत येण्याची त्यांची इच्छा होती ; परंतु समाजानें तें होऊं दिलें नाही. (ही सर्व माहिती, जिना यांच्यावरील पुस्तकात सहज उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती ज़रूर वाचावी ). या धर्मांतराचा, नंतरच्या काळात किती भयंकर राजकीय परिणाम झाला, हें आपण जाणतोच ! मात्र, यांतून आपला समाज कांहींच शिकत नाहीं, ही खेदाची गोष्ट आहे. सगळे परिणाम लगेत घडतही नाहींत, लागलीच दिसूनही येत नाहींत. मात्र, ते घडतात, तेव्हां कधी कधी फाऽर फाऽर उशीर झालेला असूं शकतो.

• हमीद दलवाई यांनी त्यांच्या लेखनात महत्वाचा मुद्दा मांडला आहे , तो हा की, आज मुस्लिमांमधील अनेक लोक केवळ लहान लहान धंदे करून जेमतेम पोट भरत आहेत. आणि खरं आहे, आपल्या सभोवताली, प्लंबर, विणकर, हातगाडी घेऊन जात असलेला भंगारवाला, फुटलेल्या काचा बसवणारा काचवाला, सायकलीवर चाक बसवून चाकू-सुर्‍यांना धार लावणारा, असे अनेक धंदे करणारे लोक मुस्लिम आहेत. हे सगळे लोक कांहीं इराण, तुर्कस्थान/ टर्की, अफगाणिस्तान वगैरे देशांमधून येथें आलेले नाहींत, तर ते या देशातील हिंदूंमधीलच विशिष्ट जातींचे लोक आहेत, ज्यांनी मध्ययुगात धर्मांतर केलेलें आहे ; आणि याला प्रमुख कारण अर्थातच हिंदूंमधील तत्कालीन लोकांचे वर्तनच आहे, यात संशय नाहीं.

• पुन्हां एकदा आठवण करून देतो की, येथें आपला दृष्टिकोन धार्मिक नसून फक्त सामाजिक आहे ; धर्माचा उल्लेख केवळ त्या अनुषंगानेंच आहे.

• धर्म ही गोष्ट असावी वा नसावी, एखाद्यानें धर्म मानावा किंवा मानूं नये, ही एक वेगळीच चर्चा आहे, तिच्यात आपण तुर्तास जात नाहीं आहोत. पण, कुठलाच धर्म perfect नाहीं, नसणारच ! मात्र, मुस्लिम धर्मात हिंदूंपेक्षा अधिक समानता practice केली झाते, हें मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलें आहे. मी शाळेत असतांना स्वत: पाहिलेलें आहे की, कांहीं तत्कालीन प्रसिद्ध फिल्मस्टार्सचे नातेवाईक आणि आमच्या हॉस्टेलमधील साधारण नोकर, हे रमज़ानचा रोज़ा एकाच दस्तरख़्वानवर बसून सोडत होते ! हिंदूंमध्ये, ज्ञानेश्वरकालीन संतमंडळ, संत एकनाथ, विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकार, राजर्षि शाहू महाराज, विवध समाजसुधारक , अशा अनेकांनी प्रयत्न करूनही समता establish झालेली नाहीं, हें कटु असलें तरी सत्य आहे.

• कदाचित थोडेसें विषयांतर होईल. पण या संबंधात, स्वतंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुत्वाची व्याख्या पहावी. दुर्दैवानें त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले. पण ही व्याख्या मूलत: राजकीय-सामाजिक आहे , धार्मिक नाहीं. त्या दिशेनें समाजानें जर विचार केला असता, तर ‘ही जात – ती जात’ असा भेदभाव संपण्याच्या दिशेनें पाऊल पुढे पडलें असतें.
(यावरील माझा लेख वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्थात, हाही एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. आत्ता, फक्त प्रस्तुत विषयाच्या अनुषंगानें त्याचा उल्लेख केलेला आहे, इतकेंच ).

• आतां तर, ‘इलेक्टेड डेमोक्रेसी’च्या संदर्भात जातपातींच्या राजकारणाचें महत्व वाढतच आहे ! जातीपातींना आज ‘एकगठ्ठा मतांचा समूह’ असेंच बघितलें जात आहे. आणि, सरकारी फायदे मिळवण्यासाठी लोक, अमुक जातीला अमुकअमुक मागासवर्घीय फायदे मिळायला हवेत, यासाठी आंदोलनें करत आहेत. (त्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा आपण तूर्तास करत नाहीं आहोत, पण – ) याचा अर्थ असा की, ‘मी भारतीय आहे’ ही भावना कमी महत्वाची ठरून, ‘मी अमुक अमुक जातीचा आहे’ ही गोष्ट priority घेते !

• स्त्रियांच्यावरील अत्याचार ही बाब पुरुषप्रधान संस्कृतीशी संबंधित आहे. हेंही मध्ययुगात वाढत्या प्रमाणात झालें. आजही सुशिक्षित स्त्रियांनाही या प्रॉबलेमला सामोरे जावें लागतें आहे (भारतातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशांमध्येसुद्धा). ज्या लोकांनी हल्लीच, डेमॉक्रेटिक पार्टीच्या ‘नॅशनल कन्हेन्शन’मधील हिलरी क्लिंटन यांचें भाषण ऐकलें-वाचलें असेल, त्यांना हें कळलेंच असेल की, हिलरींनी सुद्धा या मुद्दयाचा, एक महत्वाचा मुद्दा म्हणून, परामर्श घेतलेला आहे. स्त्रियांना मिळणारी असमान वागणूक हिलरीना अस्वस्थ करते, व त्यासाठी बरेंच कांहीं करण्याचें आश्वासन त्या देतात.

• स्त्रियांना मंदिर-प्रवेश नाकारणारे लोक, त्यासाठी धर्म व परंपरा यांची ‘दुहाई’ देतात. ज्या परंपरा समाजातल्या ५०% भागाला, म्हणजे स्त्रियांना, असमान वर्तणूक देतात, त्या काय कामाच्या?

• ज़रा कल्पना करा, या असमानतेच्या सामाजिक वर्तनाला कंटाळून स्त्रियांच्या समूहांनी जर धर्म बदलायचा असें म्हटलें, तर संपूर्ण समाजातल्या घराघरात हाहा:कार उडेल ! समाजाचें नशीब थोर म्हणूनच केवळ, अजूनतरी स्त्रियांच्या ग्रूप्सनीं असला विचार केलेला नाहीं. पण, तसें उद्या घडणारच नाहीं, याची काय गॅरंटी ?

• दलित असो वा स्त्रिया, त्यांच्यावरील atrocities, समाजाला नुसतें समजावून कमी होतील काय ? तसें जर असतें, तर , समाजसुधारकांच्या प्रयत्नांनंतर संपूर्ण समाजच बदलून गेला नसता कां ? अर्थात, तसें प्रयत्न तर होतच रहायला हवेत, हें खरें आहे ; पण, ‘न-समजून-घेणार्‍यांसाठी’ कांहींतरी strict उपाय सरकारनें योजायला नकोत कां ?

• दलित, स्त्रिया किंवा अल्पवयीन मुलें यांच्यावर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद सरकारनें केली पाहिजे. उदा. अमेरिकेत तर, अगदी आईवडीलसुद्धा जर आपल्या अल्पवयीन अपत्यांवर अत्याचार करत असले, तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊं शकते.

• भारतातही, असा शिक्षेची कांहीं तरतूद आहे, उदा. सासू-सासर्‍यांनी सुनेवर केलेले अत्याचार.
पण, हें जें कांहीं कायदे आहेत, तें कितीसें पुरेसें पडत आहेत ?

• यासाठी, पार्लमेंटनें नवीन कायदा करून, अशा गोष्टींसाठी –
– स्पेशल, ‘फास्ट कोर्टस्’ स्थापन करून , च्यातर्फे अशा केसेस चालवल्या जाव्यात
– नुसत्या atrocities च नाहीं, तर , अगदी मंदिर-प्रवेश नाकारणार्‍यांनासुद्धा सज्जड सज़ा ठेवावी, (जसें की ५ वर्षें सक्तमजुरी). Carrot & stick म्हणतात ना, त्यातील, इथें stick चा प्रयोग, किंवा धाक असल्याशिवाय अशा सामजिक सुधारणा होणारच नाहींत.( म्हणतात ना, ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ ).
– आजही कांहीं देशांमध्ये, हात तोडणें , रस्यात उभें करून दगडधोंडे फेकून मारणें अशा मध्ययुगीन शिक्षा प्रचारात आहेत. अशा मध्ययुगीन शिक्षांचा मी पुरस्कार करत आहे, असें कृपया कुणी समजूं नये. मात्र, अगदी , सक्तमजुरीच्या शिक्षेची भीती सुध्दा मोठें deterant नक्कीच ठरेल.

• पण, — आणि , हा मोठा ‘पण’ आहे —- , असा कायदा केला तर समाजाचा एक भाग सरकारवर खात्रीनें नाराज होणार, हें नक्की. मग, सरकार ही रिस्क घेईल काय ? त्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, असा कायदा आणायला हवा.
पण आपल्या राजकीय पक्षांची one-up-manship पहातां, असें काहीं घडेल, ही आशा धरावी काय, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजेच, अशा atrocities चालूंच रहाणार काय ?
म्हणे, २१वें शतक !! आपण कुठे आहोत ? अजूनही मध्ययुगातच आहोत ? आपण कुठे चाललो आहोत ? पुढे जाणें दूरच,पण हा समाज मागेमागें जात आहे काय ?
या प्रश्नांची उत्तरें शोधायला गेलें तर, हातात कांहींच fruitful लागत नाहीं , ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.

अखेरीस :
हा असमानतेचा ‘सिलसिला’ शतकानुशतकें चालत आलेला आहे. दुर्दैवानें, लोक अनेकदा short-sightedness च दाखवतात, आपल्या कृतींचे दूरगामी दुष्परिणाम त्याच्या ध्यानातच येत नाहींत; आणि थोडेफार ज़री आलेच, तरी ते त्याकडे दुर्लक्षच करतात.

पण, आपण हे सत्य विसरूं नये की, इतिहास कुणाला क्षमा करत नाहीं .
तेव्हां, इतिहासानें धडा शिकवण्यांआधी, आपणच ज़रा आपल्या मनाला विचारूं या ,
( एका प्रसिद्ध गीताला poaraphrase करून ), की –
‘ये कहाँ जा रहे हम , यूं ही अपनोंको मसलके ?’ ;
आणि, मनाला ही जाणीव करून देऊं या , की –
‘ये ज़माना बढ़ चलेगा , अब हमें ही कुचलके’ .

चला, कांहींतरी concrete करूं या, अजूनही वेळ गेलेली नाहीं !

— सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..