नवीन लेखन...

गणपति : विज्ञानयुगीन उकल : गणपतीचे विविध अवतार

पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत […]

आयुष्य लढा

चोखपणे हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा, कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा ।।१।।   घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ, क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ ।।२।।   सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते, आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते ।।३।।   पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी, […]

स्तन्यपान किती काळ चालू ठेवावे?

प्रश्नाचे उत्तर सध्याला सर्रासपणे बाळाचे वय दीड- दोन वर्षे होईपर्यंत असे ऐकू येते. कित्येक बालरोगतज्ज्ञ असे मत अहंअहमिकेने मांडत असल्याचे दिसते. मात्र तसे करणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार विचार करता; बाळाला दात येण्यास सुरुवात होणे हे वय स्तन्यपान थांबवण्यास सुरुवात करण्याचे वय असते. माणसाचेच कशाला; जगातील कुठल्याही सस्तन प्राण्यांतील माता आपल्या पिल्लांना दात येऊ लागले की […]

टिळक.. आम्हाला माफ करा !

नुकताच व्हॉटसऍपवरुन एक लेख वाचायला मिळाला. आपल्या डोळ्यावरील झापडं उघडणारा हा लेख कोणी लिहिलाय ते माहित नाही. मात्र ज्याने कोणी तो लिहिला असेल त्याला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं नक्कीच वाटत असणार. त्यामुळेच आमचाही खारीचा वाटा म्हणून हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करतोय. एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज! ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट […]

धरणातल्या पाण्याची मोजणी….

सध्या पाऊस जोरदार पडत आहे. दररोज वेगवेगळी धरणे भरल्याच्या आणि वाहून जात असल्याच्या बातम्याही येत आहेत. या बातम्यात अनेकदा काही वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले दिसतात. ते असतात पाण्याच्या साठ्याच्या मोजमापाचे…. याबद्दलची थोडी माहिती घेउ या ? 1) TMC म्हणजे काय ? 2) Cusec म्हणजे काय ? 3) Cumec म्हणजे काय ? इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. याचा नेमका अर्थ काय? आपणास फक्त “लिटर” संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात. १) 01 tmc म्हणजे one thousand millions […]

मी प्रसवलेला ‘सिद्धांत’

डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला.. मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..! कारण, एकूणच मनुष्याचे आचरट वर्तन पाहाता तो मानसीक पातळीवर अद्याप आपल्या पुर्वजांच्याच पातळीवर असावा अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे..!! (आपले राजकीय नेते, अध्यात्मीक ‘बाबा’, मेणबत्ती संप्रदाय आणि दुटप्पी ‘आम आदमी’ म्हणजे आपण सर्व यांच्यामूळे मी प्रसवलेला ‘सिद्धांत’) — गणेश […]

‘उत्कर्ष प्रकाशन’ चे सु. वा. जोशी

वर्ष १९५७… वाईजवळच्या धोम गावातून पुण्यात आलेला एक शाळकरी मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर रद्दी आणि काही जुनी पुस्तके घेऊन बसू लागला. त्यातूनच पंचवीस रूपये भाड्याने टपरी घेतली. पुढे जुन्या पुस्तकांच्या विक्रीबरोबरच नवी पुस्तकेही विकण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. होताहोता पहिले पुस्तक प्रकाशित केले आणि ही वाटचाल तब्बल पन्नास वर्षे करीत तो आज आघाडीचा पुस्तक प्रकाशक व […]

सहज-सुलभ आणि गोड अशी नारायण पेठी बोली

असे म्हटले जाते की दर दहा कोसावर भाषा बदलते. त्यामुळेच आपल्याकडे बोली भाषांना महत्त्व असावे. मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत. या नानाविध बोली भाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. पुण्यातील शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या पेठांमध्ये बोलली जाणारी भाषा शुद्ध असे एकेकाळी मानले जात होते. मात्र पुण्यातली नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे […]

देवगडातला पाऊस

कोकणातला पाऊस हा भयंकर देखणा असतो हे अनेकांकडून ऐकलं होतं, वाचलही होतं. मी कोकणातला पाऊस तसा पाहिलाही होता. परंतू देवगडातल्या ह्या तीन-चार दिवसांच्या निवांत मुक्कामात कोकणातला पाऊस अनुभवला.। आमच्या चारूचं हॉटेल देवगडातल्या समुद्रकिनार्‍यावर परंतू एका लहानश्या उभ्या कड्यावर आहे..हॉटेलच्या बाल्कनीत उभं राहीलं की समोर क्षितीजापर्यंत पसरलेला अथांग दर्या आणि दर्याच, बस्स, आणखी काही नाही..भणाणत येणाऱ्या वाऱ्याला […]

1 12 13 14 15 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..