नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

जांभया येणे

कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील “बेसल गॉंग्लिया’ नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना […]

घोरणे

घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब-याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात. […]

जीवनसत्त्वे आणि हाडांचे आरोग्य

आपल्या शरीराला उभे करण्याचे काम हाडे करीत असतात. मानवी पायामध्ये २६ हाडे असतात. मनगटासह मानवी हातामध्ये ५४ हाडांचा समावेश असतो. मांडीचे हाड हे सर्वात लांब आणि मजबूत हाड असते. कानाच्या मधल्या भागात जे हाड असते ते सर्वात लहान आणि पातळ हाड असते. हाताची हाडे ही सर्वाधिक वेळा मोडणारी हाडे आहेत. हाडांविषयीची ही माहिती आणि शरीर उभारणीसाठी […]

अर्धशिशी

कुठल्याही त्रासदायक गोष्टीला आपण डोकेदुखीची उपमा देतो, याचे कारण हेच, की डोकेदुखी चालू झाली तर माणूस अक्षरशः हतबल होतो. त्याची कार्यशक्ती, विचारशक्ती, इतकेच नव्हे, तर आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेण्याचे त्याचे सामर्थ्यही रसातळाला जाते. अर्धशिशी किंवा मायग्रेन ही अशाच प्रकारची वेदना आहे. अशा प्रकारची डोकेदुखी- मज्जातंतूंच्या दाहामुळे होत असली तरी हा दाह का होतो, याचे अचूक कारण […]

निसर्गोपचार

आपण नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. २० व्या शकाच्या सुरवातीस नॅचरोपॅथी ३ उच्च तत्वावर आधारीत होती. माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे. फक्त थेरेपीचा वापर केला जात असे. त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे. नॅचरोपॅथीचे […]

याला जीवन ऐसे नाव भाग २८

पाणी शुद्धीकरण भाग आठ पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात. अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे […]

कोरडा खोकला

कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला. कारणे श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे  कोरडा खोकला येतो. लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो. कर्करोगासाठी घशाची ‘आतून’ आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा […]

याला जीवन ऐसे नाव भाग २७

पाणी शुद्धीकरण भाग सात आपण मागे बघितले की ज्या नद्या खळाळत वाहातात, त्यांचे पाणी संथ वाहाणाऱ्या नदीच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असते. हे मूळ सूत्र ग्रंथकारांनी सांगितले. आता याच सूत्राने आपल्याला पाणी शुद्ध करता येईल का ? ज्या नद्यांचे पाणी मोठाल्या दगडावर आपटत खाली येते, उंचावरून खाली पडते, तुषार उडवणारे असते, जोरात वाहाणारे असते, ते जर शुद्ध […]

1 109 110 111 112 113 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..