नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

निसर्गोपचार

आपण नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. २० व्या शकाच्या सुरवातीस नॅचरोपॅथी ३ उच्च तत्वावर आधारीत होती. माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे. फक्त थेरेपीचा वापर केला जात असे. त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे. नॅचरोपॅथीचे […]

याला जीवन ऐसे नाव भाग २८

पाणी शुद्धीकरण भाग आठ पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात. अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे […]

कोरडा खोकला

कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला. कारणे श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे  कोरडा खोकला येतो. लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो. कर्करोगासाठी घशाची ‘आतून’ आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा […]

याला जीवन ऐसे नाव भाग २७

पाणी शुद्धीकरण भाग सात आपण मागे बघितले की ज्या नद्या खळाळत वाहातात, त्यांचे पाणी संथ वाहाणाऱ्या नदीच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असते. हे मूळ सूत्र ग्रंथकारांनी सांगितले. आता याच सूत्राने आपल्याला पाणी शुद्ध करता येईल का ? ज्या नद्यांचे पाणी मोठाल्या दगडावर आपटत खाली येते, उंचावरून खाली पडते, तुषार उडवणारे असते, जोरात वाहाणारे असते, ते जर शुद्ध […]

१० गोष्टी आरोग्याच्या

सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते. सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते. दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे . अनावश्यक अति- अंबू (पाणी )- पान […]

शिंका येणे

सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे. ऍलर्जीमुळे “सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो? सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला […]

रात्री उशीरा जेवण

वजन वाढू नये, यासाठी अनेक पदार्थ जेवणात टाळले जातात. पण याशिवाय जेवणाची वेळही आपलं वजन वाढवू शकते, असं एका संशोधनातून पुढे आलं आहे. रात्री उशिरा जेवल्यास वजन वाढू शकतं, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील ‘सॉल्क इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीज’ यांच्या नुसार रात्री जेवताना एकीकडे इंटरनेटवर काम करत असाल किंवा टीव्ही बघत असाल, तर तुमचं […]

चहाची मात्रा

किती कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे ? अनेकांच्या दिवसाची सुरवात कपभर चहाने होते. आरोग्यासाठी प्रमाणात चहा पिणे फायदेशीर आहे. त्यामुळे आरोग्य सुधारायला मदत होते. त्यामध्ये गवती चहा, चक्रफूल असे मसाल्याचे पदार्थ मिसळून आस्वाद आणि आरोग्यदायी फायदेदेखील वाढवता येतात. पण केवळ दिवसातील दोन कप चहाने शरीराला आवश्यक फायदे होतात का ? तसेच दिवसातून नेमका किती कप चहा […]

1 110 111 112 113 114 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..