नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आयुर्वेद – मुलभूत माहिती

आयुर्वेद आणि त्यासारख्या संग्रहामधून भारतात प्राचीन काळापासून असलेले वैद्यकीय ज्ञान मिळते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक वगैरे नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक  प्रतिकार शक्तिला वाढविण्यावर भर दिला जातो. आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या वेदामधून घेतले आहेत आणि त्यामुळे आयुर्वेद हा वेदाचा एक […]

ऊंची वाढवणे

साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये १८-२० वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही. अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, […]

कोरफड

कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते […]

तुळशीचे काही उपयोग

तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे. तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते. विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे […]

याला जीवन ऐसे नाव भाग २६

पाणी शुद्धीकरण भाग सहा काल काही प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरे म्हणजेच आजची टीप होऊ शकेल. शुद्ध पाणी आता दुर्मिळ होत चालले आहे. आता पाणीच दुर्मिळ होत चालले आहे, असे म्हटले तरी चुकणार नाही. यावर्षी पाऊस चांगला झाला पण नियोजनाअभावी निसर्गातून आलेले पाणी तसेच वाया घालवले. हेच नभज, आंतरीक्षज, ऐंद्रज म्हणजे ढगातून जन्मलेले, अंतरीक्षातून आलेले किंवा […]

थंडीच्या दिवसांत कानमंत्र

थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी जास्त घ्यावी लागते. केस त्वचा कोरडी होते. अशा वेळी काही घरगुती उपचार करा. वाटीत खोबरेल तेल घेऊन ते गरम करावे. नंतर कापसाच्या बोळ्याने तेल संपूर्ण डोक्याला लावावे. हलक्या हाताने मालीश करावे. उथळ भांडयात पाणी गरम करून वाफ घ्यावी. गरम पाण्यात टॉवेल बुडवून घट्ट पिळून डोळ्यांभोवती गुंडाळावा व दहा मिनिटांनी पुन्हा मालीश करावे. […]

दोन आठवडय़ात ४ किलो वजन घटवण्यासाठी वेट लॉस डाएट प्लॅन

* काबरेहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचे मिश्रण असलेले जेवण दिवसातून ६ वेळा घेणे गरजेचे आहे. रात्रीचे जेवण नेहमी हलके घ्या, ज्यात फायब्रस काबरेहायड्रेट्सचा समावेश असेल. सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा. * काबरेहायड्रेट्स, शर्करा आणि चरबी, सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या तळलेल्या पदार्थाचा समावेश जेवणात करणे टाळा. * शरीरातील चरबी वेगाने घटवण्यासाठी […]

थंडीत पायाच्या टाचांना भेगा पडणे

थंडीत पायाच्या टाचांना भेगा पडणे अगदी सामान्य आहे. परंतू भेगा वाढणे, सूज येणे, वेदना होणे, यामुळे चालताना त्रास जाणवतो. यापासून वाचण्यासाठी उपाय पेट्रोलियम जेलीचा वापर सर्वात सोपा उपाय आहे. यासाठी दीड चमचा व्हॅसलीनमध्ये एक लहान चमचा बोरिक पावडर मिसळून घ्या. रात्री झोपताना ही पेस्ट टाचांवर लावून घ्या. काही दिवसात आराम पडेल. आमचुराचे तेल भेगांसाठी रामबाण औषध आहे. […]

याला जीवन ऐसे नाव भाग २५

पाणी शुद्धीकरण भाग पाच पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे. त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील. एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे […]

याला जीवन ऐसे नाव भाग २४

पाणी शुद्धीकरण भाग चार पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात. दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. […]

1 111 112 113 114 115 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..