नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

याला जीवन ऐसे नाव भाग २४

पाणी शुद्धीकरण भाग चार पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात. दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. […]

ऑलिव्ह ऑईल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

जेवणात अथवा खाण्यासाठी आपण कोणते तेल वापरतो यावरही आपले आरोग्य अवलंबुन असते. आजकाल जेवण बनविण्यासाठी कोणते तेल वापरावे याबद्दल बहुतेक जण जागरुक असतात. अगदीच डॉक्टबरांच्या सल्ल्याने नाही तर सर्वसाधारण माहिती घेऊनच आज तेलाचा वापर केला जातो. ज्या तेलामध्ये फॅट्‌स कमी अथवा कॅलरिज कमी अशा तेलाचा वापर करण्याकडे सर्वांचा कल असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे […]

जागतिक चहा दिन (१५ डिसेंबर)

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध […]

स्लिप डिस्क

मणक्यांभोवतीच्या पेशींना इजा होऊन त्या तुटतात तेव्हा स्लिप डिस्क हा आजार होतो. दोन मणक्यांमधील मऊ चकती हालचाल करण्यासाठी, पुढे मागे करता येण्यासाठी या पेशी मदत करत असतात. ही सरकल्यामुळे हा आजार होतो. पाठीचा मणका हा 26 हाडांनी बनलेला असतो. प्रत्येक हाडांमध्ये मऊ चकती असते. ही चकती हाडांचे रक्षण करतेच; परंतु चालताना, पळताना शरीराला बसणार्याय हादर्यांुपासून मणक्याचे […]

कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे. आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर […]

याला जीवन ऐसे नाव भाग २२

पाणी शुद्धीकरण भाग दोन पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, “पाणी शुद्ध कसे करा” हे मात्र सांगितले जात नाही. “इट इज नाॅट अवर बिझनेस” असं म्हटलं की विषय संपत नाही राव ! आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे […]

बेस्ट बिफोर…..!

२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी “ग्राहक संरक्षण कायदा – १९८६” वर स्वाक्षरी केली. या निमित्ताने आपण दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण त्याचा किती उपयोग करतो? […]

कोलेस्टेरॉल

चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. […]

याला जीवन ऐसे नाव भाग २१

पाणी शुद्धीकरण भाग एक दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे. दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून […]

फीट्स येणे म्हणजे काय?

फीट्स, मिरगी, आकडी, फेफरं या नावानं ते ओळखलं जातं. इंग्रजीत मात्र त्याला एकच शब्द आहे, एपिलेप्सी. खरं तर हा एपिलेप्सी किंवा फीट्स येणं हे काही व्यंग नाही. तसंच हा आजारही नाही. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. हे संतुलन पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यावर ती व्यक्ती सर्वसामान्यांसारखीच असते. ब्लडप्रेशर, […]

1 112 113 114 115 116 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..