बेस्ट बिफोर…..!

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात आले.

२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी “ग्राहक संरक्षण कायदा – १९८६” वर स्वाक्षरी केली. या निमित्ताने आपण दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण त्याचा किती उपयोग करतो?

आपण हल्ली ब्रेड हा पोळीला पर्याय म्हणून आहारात वापरत असतो. ब्रेड बटर किंवा एखादं सॅंडविच हे नाश्‍त्याच्या वेळी किंवा मधल्या वेळी खाल्लं जातं. तेलकट-तुपकट नसत म्हणून सॅंडविचला हेल्दी फूड मानणारेही बरेच जण आहेत. ब्रेड तयार करतांना काही घातक पदार्थ त्यात मिसळले जातात असा काही महिन्यांपूर्वी अभ्यासकांनी निष्कर्ष काढला होता. ब्रेड आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानीकारक ठरू शकतो असे तज्ञांचे म्हणणं होतं. काही अभ्यासक आणि आहारतज्ज्ञ तर ब्रेडला अन्नपदार्थ म्हणून मान्यता देत नाहीत  इतके त्याचे पोषणमूल्य कमी आहे. आपणही नियमित ब्रेड खात असू तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात  ते लक्षात घ्यायला हवे.

अन्न आणि औषध प्रशासनाने १९५५च्या कायद्या प्रमाणे प्रत्येक उत्पादित वस्तूवर उत्पादकाने मालाची/वस्तूची उत्पादित दिनांक (Manufacturing Date) आणि ती वस्तू वापरण्याची शेवटची तारीख (Expiry Date) लिहिणं  बंधनकारक आहे. पण सध्या बाजारात मिळणारे वेगवेगळ्या उत्पादकांचे ब्रेड पाकिटांवर पॅकिंग/मन्यूफ्रॅचारिंग (तयार करण्यात आल्याची तारीख महिना आणि वर्ष) कधीच लिहिलेली अजून तरी बघण्यात आली नाही. फक्त ब्रेड संपविण्याची शेवटची एक्स्पारिची तारीख असते. यावरून कसं कळणार की ब्रेड कधी बनविला गेला आहे? अन्न व औषध प्रशासनाच्या १९५५ कायद्या नुसार सर्व अन्न पदार्थांच्या पाकिटांवर दोन्ही तारखा असावयास पाहिजेत पण परंतु ब्रेड पाकिटावर एकच तारीख प्रिंट केलेली असते ती म्हणजे ब्रेड संपविण्याची. असे का?

तरी शासनाचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय यात गांभीर्याने लक्ष घालून त्यावर योग्य ती कार्यवाही करतील का?

जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..