नवीन लेखन...

फीट्स येणे म्हणजे काय?

फीट्स, मिरगी, आकडी, फेफरं या नावानं ते ओळखलं जातं. इंग्रजीत मात्र त्याला एकच शब्द आहे, एपिलेप्सी. खरं तर हा एपिलेप्सी किंवा फीट्स येणं हे काही व्यंग नाही. तसंच हा आजारही नाही. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. हे संतुलन पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यावर ती व्यक्ती सर्वसामान्यांसारखीच असते.

ब्लडप्रेशर, मधुमेह, अॅसिडिटीसारखे आजार जसे असतात, तसंच हे. नियमित औषधोपचार घेतल्यास या फीट्स येण्यावर नियंत्रण मिळवून एक उत्तम आयुष्य जगता येतंच!
मात्र आपल्याकडे अजूनही या फीट्स येण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. मज्जा किंवा चेतासंस्थेच्या आजारांतला झटका केवळ दहा ते तीस सेकंदांचा असतो. काही वेळा त्यानंतर मूल बेशुद्ध पडते किंवा डोळे फिरवते. या आजारात तीव्र झटका हा एकाचवेळी संपूर्ण शरीरात येतो. यात तोंड, हातपाय तसेच शरीरातील अन्य स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. मेंदूकडे पोहोचणाऱ्या संवेदना काही वेळासाठी यात खुंटतात, त्यामुळे यावेळी मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. काहीवेळा तापाचे प्रमाण वाढल्याने फेफरे येतात. हा काळ पंधरा मिनिटे ते अर्धा तास इतका असतो.

लक्षणे
पहिल्या टप्प्यांत चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, शरीर सैल पडणे अशी लक्षणे जाणवतात फेफरे किंवा फिट येण्याच्या टप्प्यांत काही तीव्र संवेदना कारण ठरू शकतात.
मेंदूमधील कंपनांमध्ये किंवा कामात अडसर निर्माण होणे.
खूप ताप, अचानक वाढलेला रक्तदाब वा मधुमेह

अतिनैराश्य
रक्तदाबाचे प्रमाण खाली जाणे.
चक्कर येऊन आदळल्याने शरीर सैल पडणे
श्वसनाचा वेग मंदावणे

रुग्णांची प्राथमिक काळजी काय घ्यावी.
फिटस् येत असतील तरी सतत या आजाराच्या दडपणाखाली राहू नये. दुखापत होईल, असे काम हाती घेऊ नये, उदा. विस्तवाजवळ काम करणे, उंचावर चढणे, जोरात वाहन चालवणे

डोळ्यावर तीव्र प्रकाशझोत येईल अशा ठिकाणी काम करणे टाळावे.
औषधोपचार सुरु असतील तर त्यात खंड पाडू नये.
प्राणायाम, योगा या सारख्या वेदनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या थेरपीज् महत्त्वाच्या असतात. त्यांचा वापर करावा. हा त्रास असणाऱ्या रुग्णांमध्ये औषधांनी थोडी झोप येते. पण, त्यामुळे औषधे बंद करू नयेत.

फिटस् रोखण्यासाठीचे उपचार
फीट आली तर रुग्णाच्या तोंडाजवळ चप्पल सरकवली जाते. ही अतिशय चुकीची कल्पना आहे. दातामध्ये पट्टी, चमचा किंवा कपडा सरकवण्याचा प्रयत्न केला तर इजा होऊ शकते. रूग्णाला दाबून धरले तरी त्याला इजा होते.

रुग्णाला कुशीवर झोपवावे, त्याची लाळ गळू द्यावी. त्यानंतर, रुग्णाला धीर द्यावा. फीट आली असता नाकात उग्र वासाचे वेखंड फुंकावे पण ते नाकात जाणार नाही याची काळजी घ्यावी. ते नसल्यास मिठाच्या पाण्याचे एक-दोन थेंब त्यावेळी नाकपुडीत सोडावेत. लगेच करायचा उपाय म्हणून त्याचा उपयोग होतो. या रुग्णांना मानसिक आधार देणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

नैराश्यामुळे फिटस् येण्याचे प्रमाण वाढू शकते. सकस पोषक आहार, नियमित व्यायाम, मोकळ्या हवेतला वावर वाढवल्याने फिटस् येण्याचे प्रमाण निश्चितच कमी करता येते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.म.टा

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on फीट्स येणे म्हणजे काय?

  1. ,mazya aaila magchya 2 vrshanpasun ha tras hotoy. Aata tich vay 65 aahe. pan tya mdhe ti achank gapp hote , jevta jevta kiva bsleli asel tr kiva bolta bolta stubdd hote.jeva shuddhivr yete tevha ti kahi divsapurvich visrleli aste .he fitsmdhe hot ka?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..