नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आरोग्य नाकाचे

नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वाचसोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे […]

रक्तदाब(Blood Pressure)

मानवी शरीरात 50 हजार अब्ज पेशी असतात. प्रत्येक पेशीला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा पेशीतच तयार होते. ही उत्पन्न करण्याकरता प्राणवायू आणि अन्नघटक लागतात. हे संपूर्ण शरीरभर पुरवण्याचे कार्य हृदय आणि रुधिराभिसरण संस्था करीत असतात. या संस्थांमधून रक्ताचा प्रवाह सतत चालू असतो. असा प्रवास टिकण्याकरता या संस्थेत जागोजागी कमी-जास्त दाब निर्माण […]

खाज सुटणे

नखासारख्या टणक अथवा अणकुचिदार किंवा टोकदार वस्तूने ओरखडा काढण्याची प्रबळ इच्छा निर्माण करणारी संवेदना म्हणजे खाज. त्वचेत पसरलेल्या मोकळ्या ज्ञानतंतूंच्या टोकांतून ही संवेदना निर्माण होते. शरीराच्या काही भागातील त्वचेतून अशी संवेदना अधिक सहजतेने निर्माण होते. बाह्य कर्णातील बोगद्यासारखा भाग, जननेंद्रियांवरील त्वचा, गुदद्‌वारासमीपची आणि नाकपुड्यांच्या शेजारची त्वचा, ही काही उदाहरणे आहेत. काही रासायनिक रेणू, काही विद्युत चेतना […]

याला जीवन ऐसे नाव भाग २९

पाणी शुद्धीकरण भाग नऊ या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ? ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण […]

हर्निया

पोटात दुखणे, गुदद्वारा (अॅनस) जवळ खाज येणे ही सामान्य लक्षण वाटू शकतात. परंतू ही सारी ‘हर्निया’ या आजाराची लक्षणं असू शकतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास त्यातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. काही शस्त्रक्रिया, लठ्ठपणा,बद्धकोष्ठता, कमजोर स्नायू यामुळे हर्निया जडू शकतो. प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळणार्या् या आजारावर शस्त्रक्रियेने वाढलेला भाग किंवा स्क्रिन काढणे हाच उपाय उपलब्ध आहे. म्हणूनच […]

दरवर्षी करा रेटीना तपासणी

मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंटड्ढोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी […]

निद्रानाशाच्या समस्येवरील घरगुती उपाय

तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे. या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय कारणे […]

जांभया येणे

कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील “बेसल गॉंग्लिया’ नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना […]

घोरणे

घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब-याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात. […]

जीवनसत्त्वे आणि हाडांचे आरोग्य

आपल्या शरीराला उभे करण्याचे काम हाडे करीत असतात. मानवी पायामध्ये २६ हाडे असतात. मनगटासह मानवी हातामध्ये ५४ हाडांचा समावेश असतो. मांडीचे हाड हे सर्वात लांब आणि मजबूत हाड असते. कानाच्या मधल्या भागात जे हाड असते ते सर्वात लहान आणि पातळ हाड असते. हाताची हाडे ही सर्वाधिक वेळा मोडणारी हाडे आहेत. हाडांविषयीची ही माहिती आणि शरीर उभारणीसाठी […]

1 109 110 111 112 113 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..