सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य
फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते. बदलून चालतही नाही श्रीमती पिंटो नावाच्या एक महिला एक दिवस माझ्याकडे आल्या. त्यांची तक्रार जरा वेगळीच आणि काहीशी गमतीशीर होती !श्रीमती पिंटोच्या चेहऱ्यावर गेली दोन वर्षे पुटकुळ्या उठत होत्या पण पुटकुळ्यांची पद्धत अशी की त्या शनिवार-रविवारी अगदी फुलून येत आणि नंतर आपोआप हळूहळू मावळून जात ! […]
