नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

रजोनिवृत्ती

स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक विकासाचे जे टप्पे आहेत त्यात रजोनिवृत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडत असतात. चाळिशी-पन्नाशीच्या दरम्यानचा काळ रजोनिवृत्तीचा कालावधी असतो. नेमके याच दरम्यान तिच्या आयुष्यात काही मनाविरुद्ध व काही दुर्दैवी घटनाही घडतात. मुले आपापला संसार थाटून वेगळे नांदायला जातात. कधी आयुष्याचा जोडीदार अचानक जग सोडून जातो. […]

हाता पायाला मुंग्या येणे

दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. समजा […]

आपले यकृत निरोगी ठेवा

यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही […]

खायची पानं आणि एरंडेल तेल – डोकेदुखी दूर करण्याचा घरगुती उपाय

मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत […]

रक्तदाब कमी होणे(Low B.P)

रक्तदाब कमी होण्याच्या समस्येकडे हायपरटेंशन ( रक्तदाब वाढणे) इतके लक्ष दिले जात नसले तरीही त्यातून आजाराची गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ / निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळतात. अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना सुचत नाही. अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर […]

अपेंडिक्स

अपेंडिक्सची शस्त्रक्रिया ही नेहमी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. आतड्यातील अपेंडिक्स नावाच्या छोट्या शेपटीला सूज आल्यामुळे, पोटात तीव्र दुखणे सुरू झाल्यास शस्त्रक्रिया करून ही शेपटी काढून टाकावी लागते. असे दुखणे होऊन; पण त्याचे योग्य निदान न झाल्याने किंवा भीतीपोटी काही वेळा ही शस्त्रक्रिया वेळेवर केली गेली नाही, तर रुग्णाचा जीव धोक्यानत येतो. जेथे लहान […]

दमा

दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक  गोष्टींची अ‍ॅलर्जी निर्माण होऊन खोकला येतो, छाती भरते, बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अ‍ॅटॅक’ असं म्हणता येईल. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण […]

सोयाबीन

आपली प्रकृती सुधारण्यात विविध पदार्थांची वेगवेगळी भूमिका असते. सोयाबीनही त्यासाठी फायद्याचे ठरते. यापासून तयार केलेले पदार्थ आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. यामध्ये सोया सॉस, मोड आलेले सोयाबीन, सोयाबीन दूध, आटा अशा सोयाबीनच्या पदार्थांचे सेवन केले असता अनेक आजारांपासून दूर राहता येते. सोयाबीनपासून मिळत असलेल्या प्रथिनांमुळे (प्रोटिनमुळे) आपल्या हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर यामध्ये असलेल्या इसोफ्लेवोन्स या […]

हृदयविकार म्हणजे काय?

हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा करणा-या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते बंद पडते. यालाच हृदयविकार म्हणतात. हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायूंमुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टिव […]

आरोग्य नाकाचे

नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वाचसोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे […]

1 108 109 110 111 112 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..