नवीन लेखन...

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत

कंगना राणावतचे वडील अमरदीप राणावत एक व्यापारी व आई आशा राणावत एका शाळेवर शिक्षिका होत्या. तिचा जन्म २३ मार्च १९८६ रोजी हिमाचल प्रदेश येथील मंदी जिल्ह्यातील भाम्बला येथे झाला.तिने चंदिगढ येथील DAV स्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी तेथेच विज्ञानात केले. आई वडिलांची अशी इच्छा होती कि कंगनाने डॉक्टर बनावे. परंतु १२ वीत केमिस्ट्रीच्या युनिट टेस्ट मध्ये फेल झाल्यावर तिने ऑल इंडिया प्री मेडीकल टेस्ट देण्याचे मनातून काढून टाकले. आणि आपल्या भवितव्याला योग्यरीत्या निर्धारित करण्याचे ठरविले. पुढील शिक्षणासाठी कंगना दिल्लीला वयाच्या १८ व्या वर्षी राहायला आली. तिला मेडिकल क्षेत्रात जायचे नव्हते. कोणते क्षेत्र करियर म्हणून निवडायचे अशा विचारात असतानाच अचानक एका मोडेलिंग एजन्सीला तिचे लुक्स आणि अंदाजांना प्रभावित होऊन काही मौडेलिंग असाइनमेन्टसाठी बद्ध केले.या क्षेत्राबद्दल तिला जास्त रुची नव्हती. कारण तिला वाटायचे कि या खेत्रामध्ये क्रिएटीवीटीसाठी कोणतीच जागा नाही. म्हणून तिने अभिनयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी तिने अस्मिता थियेटर ग्रुप मध्ये सदस्य म्हणून कार्यरत झाली. येथे डिरेक्टर अरविंद गौर यांनी तिला अभिनयाचे गुण शिकविले. त्यांच्या थिएटर ग्रुप मध्ये राहून नाट्यामध्ये प्रभावशाली अभिनय केला. एका प्रयोगात सोबतच्या पुरुष अभिनेत्याचा रोल स्वतःच्या रोल सोबत करून तिने सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले. त्यानंतर कंगना मुंबईला आली अभिनयात आपले करियर व्हावे यासाठी ख्यातनाम आशा चंद्रा यांच्या ड्रामा स्कूल मध्ये चार महिन्यांचा कोर्स साठी दाखला घेतला. कंगना राणावत यांनी २००६ मध्ये आलेल्या थ्रिलर फिल्म “गैंगस्टर” नी चित्रपटात प्रवेश केला. यासाठी त्यांना बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला. यानंतर २००६ च्या शेवटी आलेली फिल्म “वो लम्हे” मध्ये तिने एक भावूक भूमिका असलेले पात्र अभीनित केले. पुढे (२००७) लाइफ इन_ _ मेट्रो आणि (२००८) फैशन सारखे सुपरहिट चित्रपट केले. यासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअर अवार्ड आणि याच श्रेणीत एक फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाले आहे. कंगनाने यानंतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट “राज : द मिस्ट्री कंटिन्यूज” (२००९) आणि “वन्स अपोन ए टाइम इन मुंबई” (२०१०) केले. त्यानंतर त्यांनी (२०११) मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेली फिल्म “तनु वेड्स मनु” मध्ये अभिनेता आर.माधवन यांच्यासोबत विनोदी भूमिका केली. यानंतर त्यांनी सुपरस्टार ह्रितिक रोशन यांच्या सायन्स फिक्शन फिल्म “क्रिश 3” (२०१३) मध्ये एक उत्परीवर्ती जंतूची भूमिका केली. हि फिल्म बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटामधील एक मानली जाते. २०१४ मध्ये चित्रपट “क्वीन” मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड सुद्धा मिळाला. २०१५ मध्ये कंगनाची आणखी सर्वोत्तम फिल्म “तनु वेड्स मनु रिटर्न्स” मधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर क्रिटीक्स अवार्ड आणि दुसरयांदा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लगातार दुसरा फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड मिळाला हि उपलब्धी कोणत्याही महिला कलाकाराने मिळविलेली पहिली मानली जाते. त्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्र्यामधून एक आहे. कंगना भारतीय मेडीया मध्ये इमानदारी आणि खऱ्या मनाने सामान्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलावंतांमध्ये गणल्या जाणारी कंगना तीन राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि चार विविध श्रेणीमध्ये फिल्मफेयर अवार्ड जिंकणारी अभिनेत्री आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..