नवीन लेखन...

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की ‘भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९१५ रोजी झाला.

“हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा.”

नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणिने खुप प्रभावित झाले होते.त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता.आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते ‘इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते. त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!’ पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता. गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी दिली. गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला. काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की ‘तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?’तर सुभाषबाबु म्हणाले की ‘मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.’ गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही. गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला. त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात असत.

आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत.सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले होते की “मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल. मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही. मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल.मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत.

नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती. त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता.त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता.त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी ‘साम्यवाद’ हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे,निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता. नेताजीं व सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना ‘ब्रिटीश अधिकार्यां चे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात. त्यापेक्षा दुसर्याे महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.’ असे सांगितले. यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली. सावरकर हे भारतातील ‘द्रष्टे नेते’ आहेत हे नंतर त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर्’या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात “इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना है|हमै कुर्बानी खाना है| सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी | इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकर|कोई बात नहीं है…हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे…कोई बात नही है| सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी…हिंदुस्तान आझाद होगा!!! नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन १ मे १९७२ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..