नवीन लेखन...

वडे

 

त्या वेळी मी पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत होतो. रविवार पेठेत मावशीकडे राहण्याची सोय होती अन् काही तरी रोजगार मिळविण्याचे प्रयत्न असत. घरचा, आई-वडिलांचा आधार नव्हता असं नव्हे; पण स्वत कमवावं आणि शिकावं अशी प्रवृत्ती होती. माझ्या मावशीच्या हाताला खूप चव होती. तिनं काहीही करावं अन् ते सर्वांना आवडावं, असं होतं. ती बटाटेवडे छान करायची. एकदा आमच्याकडे त्यांचे दीर आले होते. सहज गप्पा चालल्या होत्या. ते म्हणाले, `वहिनी, तू आमच्या शाळेत वडे का नाही विकत? छान खपतील. चार पैसे मिळतील.’ तेव्हा ते मॉडर्न हायस्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करीत असत. झालं, चर्चेचं रूपांतर विचारात आणि योजनेत झालं. त्या वेळी माझ्याबरोबरच माणिक भंवर नावाचा माझा मित्रही मावशीकडे राहत असे. दरमहा 20 रुपये त्यानं द्यावेत आणि जेवून-खाऊन राहावं असं ठरलं होतं. त्यालाही पैशाची गरज होती. झालं, आमचं ठरलं. मावशीनं वडे रावेत आणि आम्ही ते गरमागरम शाळेत नेऊन विकावेत. दुपारच्या सुटीत शिक्षकांना एक छान, चवदार पदार्थ या सेवेतून मिळाला होता. 25 पैशाला एक वडा. त्या वेळी रस्त्यावर तो 10 पैशात मिळायचा. आमचा घरगुती, अस्सल म्हणून 25 पैसे. चांगला, दर्जेदार पदार्थ दिला, की जास्त पैसे द्यायला णी मागे-पुढे पाहत नाही, याचा अनुभव आला. गोविंद हलवाई चौक ते मॉडर्न हायस्कूल- रोज दुपारी आमच्या सायकली अशा पळत की कोणालाही वाटावे, वड्यांचा घाणा इथंच काढलाय. आमचा रोजचा रतीब सुरू झाला. रोज 30 वड्यांवरून संख्या 50-60 वर गेली. गुरुवारी-शनिवारी त्यात साबुदाण्याची खिचडीही सुरू झाली. टिकाऊ काही असावं म्हणून ज्वारीच्या फोडणीच्या लाह्याही देऊ लागलो. एकूण धंद्याला बरकत होती. रोज हातात काहीतरी रक्कम खेळती असे. मजा येत होती. आज 80 वडे करायचं असं ठरलं. त्याच दिवशी माझे

वडील आले. त्यांनाही हा

पदार्थ आवडे. जरा जास्तच वडे करायचा बे
झाला. आज त्यांच्या निमित्तानं आम्हालाही वडे खायला मिळणार होते. अन्यथा, रोज वड्यांबरोबर तयार होणाऱया छोट्या मण्यांवर आम्ही समाधान मानत असू. दुपारी एकच्या सुमारास पहिला डबा घेऊन माणिक रवाना झाला आणि अवघ्या वीस मिनिटांत मीही शाळेत खल झालो. आज शाळेत वेगळंच चित्र होतं. त्या वेळच्या शाळेच्या संचालिका जयश्रीबाई वैद्यांनी शाळेत बाहेरचा कोणताही पदार्थ विकण्यास प्रतिबंध केला होता. आता काय? हा प्रश्न आमच्यापुढे होता. बाहेर वडे विकावेत, तर इतरांचा वडा दहा पैशात; आमचा महागाचा वडा कोण घेणार? थोडा प्रयत्न ला. चार वडे विकले गेले. डबे अजून खूपच जड होते; पण आता घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. खालच्या मानेनं घरी आलो. काय झालं ते सांगू लागलो. आमचे पिताश्री घरी होतेच. आपले चिरंजीव अपयशी होऊन घरी आलेले पाहताच त्यांचा संताप झाला. त्यांनी शेलक्या शब्दांत आमची संभावना

 

केली. त्या साऱयाचं सूत्र एवढंच होतं, `तुम्हाला धंदा जमत नाही. तुम्ही रडे आहात. काही लाज वाटत असेल तर जा आणि वडे विकून या.’ आमची परिस्थिती समजावून घ्यायला ते तयार नव्हते. त्यांना आमच्याबद्दल सहानुभूती नव्हे, तर राग होता. आम्ही डबे उचलले बाहेर पडलो. मी त्या वेळच्या मिनर्व्हा थिएटरवर गेलो, तर माणिक आर्यनला. सिनेमाच्या इंटरव्हलला वडे विकण्याचा प्रयत्न केला. विक्रेत्या स्पर्धकांची जागांवरून कशी मारामारी होऊ शकते, याचा अनुभव आला; पण गेला बाजार चार-चार वडे विकले गेले. आता काय? त्यानंतर जवळच्या विजयानंद थिएटरवर गेलो. तिथंही थोडं यश ळालं. दुपारची संध्याकाळ झाली होती. अखेरीस मंडईत येऊन स्थिरावलो. परिसरात हिंडलो. `वडे।़ गरम वडे’ अशी हाळी दिली. आणखी चार वड्यांना ग्राहक मिळाले. सायंकाळच्या साडेसातचा मध्यंतर करायचा ठरवून दोघेही पांगलो. आठला परत आलो तेव्हा सर्व मिळून 40 वडे विकले गेले होते. घरी जाण्याचा धीर आला होता. माणिक म्हणाला, `तुझ्याकडे किती पैसे आहेत.’ मी म्हणालो, `दोन रुपये,’ तो म्हणाला, `दे इकडे.’ त्यानं दोन रुपये घेतले.

 

स्वतच्या खिशातून आणखी दोन रुपये घेतले आणि वड्यांच्या गल्ल्यात टाकले. आता आपण चार-चार वडे खाऊ शकतोय. मला तर खूप भूक लागलीय, सं म्हणून तो वडे खाऊ लागला. मीही घेतले. चार वड्यात पोट भरलं होतं. शांतपणे घरी आलो. एकूण अठ्ठेचाळीस वडे विकले होते (आम्ही घेतलेले आठ). तरीही डबा जड होता. तो मावशीकडे दिला. आमचा अनुभव सांगितला. आता वडील खूष होते. मी परिस्थितीपुढे हार स्वीकारली नव्हती. आम्ही प्रयत्न केले होते आणि फार नाही पण यश तर मिळालंच होतं. वडील आणि मावशी यांच्या कौतुकानं पोट आणखी भरलं होतं. आपणही काही करू शकतो, हा विश्वास मनात रुजू लागला होता. छान वाटत होतं. एवढ्यात मावशीनं आम्हा दोघांना हाक मारली, म्हणाली, `पोरं रोज कष्ट घेतात. वडे विकतात, पण त्यांच्या तोंडी काही जात नाही. चला रे आज आपण पोटभर वडे खाऊ.’ मावशी आम्हाला आग्रह करून वडे वाढत होती. आम्ही एकमेकांकडे पाहत ते संपविण्याचा प्रयत्न करीत होतो. आज हे सारं आठवलं की गंमत वाटते. आता मावशी किंवा वडील हयात नाहीत; पण मावशीचं प्रेम आणि वडिलांची शिकवण विसरू शकत नाही. परिस्थिती बदलते, अडचणी येतात; पण त्यापासून मागे फिरणाऱयाला रड्या म्हटलं जातं. मी रडा नाही, हे त्या वेळी मनावर बिंबलं. आजही ते ताजं आहे. वड्यांइतकंच गरमागरम आहे.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..