नवीन लेखन...

योग: कर्मसु कौशलम्

कर्माच्या दोरीवरून चालताना दुसर्या बाजूचा तोलही सांभाळावा लागतो. ही दुसरी बाजू अपेक्षांची! मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही नाही त्याचं. साधं थँक्यू म्हटलं नाही. ..वाईट वाटतं. अगदी खरं आहे. पण हळूहळू ते वाईट वाटणं ही कमी व्हायला हवं. कारण ते वाईट फक्त आपल्याला वाटत असतं. ज्याला ते कळायला हवं त्याच्या ते गावीही नसतं. ‘योग: कर्मसु […]

कोकणातील वन्यजीव,त्यांचे संरक्षण

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उगम पावणारी ही पर्वतरांग महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांमधून जाताना 1600 कि.मी. अंतर कापते. हीच पर्वतरांग केरळात समुद्राखाली जाऊन श्रीलंकेत प्रकट होते. ही पर्वतरांग उभा आडवा विस्तार मिळून सुमारे 16 लक्ष चौरस कि.मी.चा भाग व्यापते. […]

वार्धक्याच्या वळणावर

वार्धक्यावस्थेचे नियोजन करणे आज गरजेचे झाले आहे. या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते आर्थिक नियोजन. त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक शिस्त अंगी बाणवून घेणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे निदान आर्थिक परावलंबित्वापासून सुटका होणे शक्य आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि शारीरिक स्वावलंबन हा आदर्श वार्धक्याचा पाया आहे. हल्लीच एका परिचित वृद्ध स्त्रीच्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केली. निघताना वकील मैत्रिणीनं त्यांना […]

आफ्रिकेचे बिअर आख्यान

‘केनिया बिअर’चा संस्थापक जॉर्ज हर्स्ट एके दिवशी शिकारीला गेला असतांना त्याला एका हत्तीने ठार मारले. जॉर्जच्या स्मरणार्थ बिअरला ‘टस्कर’ नाव दिले. ही बिअर इतकी लोकप्रिय झाली की इंग्लंडच्या सुपरमार्केटमध्ये ती २००८ सालापासून विक्रीसाठी अवतरली. […]

लवंगांच्या वृक्षांनी डवरलेले झांझीबार

भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्‍यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो. […]

तुमचं आमचं ‘सेम’ असतं !

झांझीबारला जाणार्‍या विमान-प्रवेशाचा पास घेण्यासाठी लागलेल्या रांगेतले सहप्रवासी बघितल्यावर माणिकताईंचे गीत आठवले. ‘सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी’. काही तर चक्क कॉफी रंगाचे. म्हटले तर गोरे आणि नाही म्हटले तर सावळे. […]

झांझीबार डायरी – अवघा रंग एकचि झाला

एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले. […]

वैश्विक अन्न दिन

आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. […]

न्यु सेंच्युरी थिएटर – न्युयॉर्क

आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता. […]

वैश्विक ओझोन दिन

आज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. […]

1 74 75 76 77 78 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..