नवीन लेखन...

हिंदू धर्मात स्नानाचे माहात्म्य

स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये. जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे. अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे. […]

संवाद

संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा. […]

“जोखीम”

आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता. […]

गोष्ट छोटी – दोन आज्यांची!

एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस […]

योग्य आणि योग्यता

योग्य आणि योग्यता या दोन्हीची समज असणे आवश्यक आहे. जसे एखादा दागिना बनवताना कोणता हिरा कुठे लावावा याची समज कारागीरला असेल तर तो छोट्या मोठ्या सर्व हीऱ्यांचा वापर आपल्या दागिन्यात करून घेतो. तसेच एका कंपनीचा मालक आपल्या कंपनीत एखाद्या पदासाठी कोणाची निवड करताना त्याची योग्यता तपासतो. […]

योगेश्वर श्रीकृष्ण

“ज्या वेळी धर्म लयाला जाऊ लागेल, अधर्म प्रबळ होऊ लागेल त्या वेळी, सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माची मुहूर्तमेढ पुन्हा रोवण्यासाठी, प्रत्येक युगात मी जन्म घेईन”. या स्वतःच्या वचनाला जागत, त्याने द्वापारयुगात जन्म घेतला.  […]

शारदाभुजङ्गप्रयाताष्टकम् – मराठी अर्थासह

शारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते.    […]

अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान  किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. […]

आठवतो का काळ ही भावनो

आठवतो का काळ ही भावनो? काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची , […]

सुखद वानप्रस्थाश्रमासाठी

काहींना मनाविरुद्ध वृद्धाश्रमात राहावं लागतं. वृद्धाश्रमासारखा ‘मानहानीकारक’ प्रकार टाळण्यासाठी अनेकजण खास ज्येष्ठांसाठी उभारलेल्या वसाहतींमध्ये राहणं पसंत करतात. या वसाहतींचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे ज्येष्ठांना आयुष्यातल्या संध्याकाळी स्वाभिमानाने जगता येतं. या वसाहती ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन उभारल्या जातात. आवश्यक सुखसुविधांबरोबरच वैद्यकीय सुविधाही अहोरात्र उपलब्ध असतात. संसाराचा मोह सोडून मोक्षाकडे वाटचाल करण्याचा टप्पा अशी वानप्रस्थाश्रमाची ओळख असली तरी […]

1 72 73 74 75 76 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..