नवीन लेखन...

लाले दी जान !

समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते. […]

मुंबई : रणजीचे राजे

भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रतिष्ठेच्या ‘रणजी करंडक’साठीचा २०२३-२४ चा हंगाम १४ मार्चला संपला. रणजीच्या अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या मुंबईने १९३४-३५ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून विक्रमी ४२व्यांदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली. […]

कथा गणेशाच्या

जपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे. […]

बहावा

  सकाळी तुझ्याकडे पाहीलं की, छान वाटतं. दुपारी तू भारीच चमकतोस. आणि संध्याकाळी असं वाटतं की, आकाशाच्या केशरी वस्त्रावर पिवळे बुट्टेच आहेत, तुझी फुलं. बहाव्या, ऐक ना. फुलत जा ना कधी कधी, अवचित.  […]

सुगीचे दिवस

नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते. […]

निर्गुण्डी – एक चित्तवेधक महाऔषधी

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो […]

कवठ : एक विस्मृतीत गेलेले फळ

कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतासहीत पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. हे फळ दक्षिण महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात या वृक्षाची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळेच औदुंबर, नरसोबावाडी येथे मिळणारी प्रसिद्ध कवठ बर्फी दुसरीकडे मिळत नाही. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ४ – पांथस्थांना विसावा देणारा करंज वृक्ष

करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ३ – सोनसळी पिवळा बहावा वृक्ष

बहावा! एक नितांतसुंदर असं झाड. भारतीय हरितधनातील एक महत्त्वाची वृक्ष वर्गातील वनस्पती बहावा. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू, पिवळ्या-सोनेरी रंगाच्या छटांमुळे ‘गोल्डन शॉवर ट्री’ असंही म्हणलं जातं. अशी अनेक नावं धारण करणारं भारतीय उपखंडातील मूळचं झाड. […]

1 8 9 10 11 12 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..