नवीन लेखन...

तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 1)

 

दक्षिण भारताच्या नकाशावर नजर फिरवलीत की मनात एकच राज्य उभं राहतं – तमिळनाडू.

देवालयांचा दिमाखदार वैभव, हजारो वर्षांची संस्कृती, शिल्प-कलेतून दिसणारा इतिहास, चवीने भरलेली पारंपरिक भोजन संस्कृती आणि निसर्गाच्या कुशीत जपून ठेवलेली रम्य हिल स्टेशन्स… या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे तामिळनाडू. हे राज्य अनुभवताना जाणवतं – येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक सण यामागे एक कथा आहे, एक परंपरा आहे आणि एक अद्वितीय अध्यात्मिक ऊर्जा आहे.

कोयंबतूर: तमिळनाडूची सुंदर प्रवेशद्वार

अनेक प्रवाशांचा तमिळनाडू प्रवास कोयंबतूर पासून सुरू होतो. चहाच्या बागा, देवस्थानं, उद्योग धंदे आणि आथित्याने भरलेलं हे शहर. परंतु कोयंबतूरची खरी ओळख मिळते ती शहराबाहेरच्या शांत, निसर्गरम्य आणि अध्यात्मिक ठिकाणी.

आदियोगी शिव – अध्यात्म आणि आधुनिकतेचा भव्य संगम

कोयंबतूर पासून सुमारे ३० किमी अंतरावर वसलेला 112 फूट उंचीचा आदियोगी महादेवाचा भव्य पुतळा, प्रथमदर्शनी थक्क करून टाकतो. हिरव्यागार टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला हा काळ्या दगडाचा पुतळा मनात एक विलक्षण शांतता निर्माण करतो. सूर्यास्तानंतर येथे होणारा लाइट & साऊंड शो “मिस्टिक नाईट्स” हा अनुभव अविस्मरणीय आहे. केवळ दृष्य सौंदर्यासाठी नव्हे, तर मन, बुद्धी आणि आत्म्याला स्पर्श करणारा आध्यात्मिक प्रवास म्हणून हे स्थान बरंच काही देऊन जातं.

कोयंबतूर जवळ श्री अय्यप्पन मंदिर, मरुधामलाई मंदिर, पत्तीस्स्वरर मंदिर अशी भक्तीमयं ऊर्जा देणारी अनेक मंदिरे पाहायला मिळतात. जवळपास असलेले छोटे धबधबे आणि टेकड्यांमधील निसर्ग दृश्ये प्रवासाची सुरुवातच सुखद करतात.

ऊटी: निलगिरीच्या धुक्यात हरवलेलं स्वर्गीय हिल स्टेशन

तामिळनाडू म्हटलं की डोळ्यासमोर येणारं पहिलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ऊटी. निलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे हिल स्टेशन आपल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांची मनं जिंकतं.

हिरवेगार मळे, धुक्याची चादर आणि स्वच्छ हवेतला श्वास

ऊटीचं आकर्षण फक्त थंड हवामानात नाही, तर त्या हवेत मिसळलेल्या चहाच्या सुगंधातही आहे. डोंगर रांगांवर एकसारखे विणलेल्या हिरव्या चहाच्या मळ्यांची दृश्यं मन मोहून टाकतात. ऊटी लेक, बोटॅनिकल गार्डन, रोज गार्डन आणि डोड्डाबेट्टा पीक ही प्रमुख पर्यटन स्थळं प्रत्येकाच्या यादीत असतात.

परंतु ऊटीची खरी जादू अनुभवायची असेल तर निलगिरी माउंटन टॉय ट्रेनची सफर नक्की करावी. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात सामील असलेली ही रेल्वे प्रवासात कधी दऱ्या, कधी धुक्याची सर, तर कधी चहाच्या बागेतून वळण घेताना दिसते… आणि प्रत्येक क्षण हजारो आठवणींमध्ये रूपांतरित होतो.

कोडाईकनाल: तलाव, दऱ्या आणि निसर्गाची कविताच जणू

जर ऊटी हा निसर्गाचा चित्र कला-प्रयोग असेल, तर कोडाईकनाल म्हणजे निसर्गाने लिहिलेली एक सुंदर कविता. “प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन्स” अशी ओळख असलेलं कोडाई-कनाल कुटुंबीयांसाठी, नव दांपत्यांसाठी आणि एकांत प्रिय प्रवाशांसाठी ही परफेक्ट ठिकाण.

कोडाई लेक मध्ये होणारी बोटिंग, दऱ्यांमधून उमटणाऱ्या धुक्याच्या लहरी, कोअकर’स वॉक वरून दिसणारं सुंदर दृश्य, पिलर रॉक्स, ब्रायंट पार्क – प्रत्येक ठिकाण मन शांत करतं. येथील निसर्ग हा फक्त पाहण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा  प्रवास आहे.

मदुराई: द्रविड संस्कृतीचा दिव्य मुकुट

तमिळनाडूच्या प्रवासाचा आत्मा मदुराई मध्ये धडकतो. हजारो वर्ष जुनं हे शहर ज्ञान, संस्कृती, कला व अध्यात्माचं केंद्र आहे.

मीनाक्षी अम्मन मंदिर: जिथे श्रद्धाही थक्क होते

मदुराईतील मीनाक्षी अम्मन मंदिर हे द्रविड वास्तुकलेचं सर्वोच्च उदाहरण मानलं जातं. देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांना अर्पण केलेलं हे मंदिर पाहताना असं वाटतं की शिल्पकलेने शब्दांपेक्षा अधिक प्रभाव निर्माण केला. शेकडो वर्षांपूर्वी उभारलेले गोपुरम, रंगीबेरंगी देव देवतांच्या मूर्ती, कोरीव काम, दगडी खांब आणि भव्य सभामंडप – प्रत्येक गोष्ट देवत्वाची अनुभूती देते.

रात्रीच्या प्रकाशात सजलेलं मंदिर पाहताना मनात एकच विचार येतो –भारतीय संस्कृती आणि कला वैभव याचं हे सर्वात दिव्य उदाहरण असावे!

 

लेखिका: नीलम पुजारी
संस्थापक – Marmoris Tours
संपर्क: +91- 8237810590
ईमेल: info@marmoristours.com

भाग 2 मध्ये पुढे वाचाल:
तंजावरचे राजवैभव, रामेश्वरमची अध्यात्मिक ऊर्जा, कन्याकुमारीचा तीन समुद्रांचा संगम, चेट्टीनाडची हवेल्या आणि शेवटी – हा प्रवास मनात कायम का कोरला जातो याचा उलघडा.


A Featured Article From Marmoris Tours

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..