नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)

मध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता. […]

भारतातील निसर्ग आणि विश्रांतीची पर्यटन स्थळे

निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. अशा या हिरवाईने नटलेल्या भारत देशात आपण जन्मलो हे आपलं भाग्यच! लांबच लांब पसरलेल्या हिमालय पर्वतरांगा, रांगडा सह्याद्री, त्याच्या कुशीत मनमुराद हुंदडणाऱ्या नद्या, त्या नद्यांना प्रेमाने आपल्यात सामावून घेणारे समुद्र, दूरवर पसरलेले वाळवंट हे सर्वच आपल्याला खुणावत असतात. […]

पर्यटन आणि संरक्षण

कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की एक अनामिक हुरहूर मनाला लागते. जायचा दिवस जवळ आला की आपली तयारी सुरू होते. कपडे कुठले घालायचे, बॅग कुठली न्यायची यापासून खरेदी काय करायची याचे बेत मनात आखायला सुरवात होते. परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल की नाही यापासून तिथल्या चलनात करायच्या खर्चाचे गणित सुरू होते. हे करत असताना प्रवासाचा दिवस उजाडतो आणि आपण घराबाहेर पडतो. […]

तलावांचे शहर ठाणे – भाग २

तलावांचे शहर च्या दुसऱ्या भागात आपण उपवन तलावा विषयी जाणून घेणार आहोत. निसर्ग ने ओतप्रोत भरलेल्या या तालावशेजारीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. […]

तलावांचे शहर ठाणे – भाग १

तलावांचे शहर च्या पहिल्या भागात आपण ठाणे शहरातील मासुंदा तलावा विषयी माहिती घेणार आहोत. मासुंदा तलावाला भेट न देणारा असा एकही ठाणेकर आपल्याला मिळणार नाही. […]

कथा ‘अ‍ॅन फ्रँक’ची

आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अ‍ॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो.   तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य  पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘  फोटो काढून घेत होते.  आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले.  विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अ‍ॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले  डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’. […]

डुईसबुर्ग जर्मनी ‘प्राणिसंग्रहालयाचा’ फेरफटका – भाग २

आणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग,  लाल,  गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात. […]

डुईसबुर्ग जर्मनी ‘प्राणिसंग्रहालयाचा’ फेरफटका – भाग १

जून २०१८ मध्ये आम्ही जर्मनीत डुईसबर्ग इथे राहावयास गेलो होतो. भारतात परतण्यापूर्वी चार-पाच दिवस आधी मुलगा व सुनेने  हा अनोखा आणि  नयनरम्य प्राणिसंग्रहालय  बघून घ्या असा आग्रह धरला. म्हणून आम्ही घरून नाश्ता करून व थोडा खाऊ- पाणी बरोबर घेऊन २७ जून २०१८ रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी निघालो.  त्यांच्या घरापासून केवळ ३ बस स्टॉप  इतके […]

कोस्टल रोड

दिघी मार्गे श्रीवर्धन ते अलिबाग साधारण शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतर असावे पण या कोस्टल रोड वरून जाताना तीन तासात पोचण्याचा विचार न करता निघाले तर सकाळपासून संध्याकाळ झाली तरी कंटाळा येणार नाही. […]

गोशीकिनुमा (जपान वारी)

जपानमधील एका राज्यात, अनेक तलावांनी वेढलेली ही जागा. जागेचे नाव “गोशीकिनुमा” असे नाव ठेवले गेले कारण तिथे विविध रंगांचे ५ तलाव आहेत. अक्षरश: ५ रंग वेगळे उठून दिसावेत असे हे पंचरंगी तलाव आहेत. ह्या जागेबद्दल जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तिथले फोटो पाहून क्षणभर विश्वास बसेना, खरंच अशी जागा आहे? फोटो एडिट वगैरे केले नसतील ना? अनेक प्रश्न… […]

1 11 12 13 14 15 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..