नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

फुजिझुका (प्रति-फुजी)

जपानचा पवित्र पर्वत कोणता ? असं विचारलं तर पटकन कोणीही (ह्या देशाबद्दल थोडीफार माहिती असणारे) फारसा विचार न करता अंदाजाने सुद्धा सांगू शकतील माउंट फुजी! गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जपान मधले एव्हरेस्ट! फुजीसान वरती चढण्याचा आनंद आणि पुण्य प्रत्येकाला लाभावं म्हणून तोक्यो व इतरही काही ठिकाणी फुजिझुका म्हणजे प्रति-फुजीसान बांधलेले आहेत. ह्या फुजिझुका म्हणजे प्रति-फुजी  वरती चढणे हे खरोखरच्या फुजी वरती जाऊन आल्याचे पुण्य पदरी घालते असे येथील लोक मानतात. […]

पर्यटकांचं आकर्षण – कॅपिलानो ब्रीज

निसर्गाच्या विविध चमत्काराबरोबरच कॅनडातील मानव निर्मित कलाकौशल्ये पाहून आम्ही भाराऊन गेलो. विज्ञानाची कास धरत मानवाने केलेले अदभुत चमत्कार थक्क करून सोडणारेच होते. कॅपिलानो ब्रीज हे त्यापैकीच एक ! कॅपिलानो ब्रीज म्हणजे मानवी कौशल्याचा अद्भुत चमत्कार असल्याची अनुभूती आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर झाली. मती गुंग करणारीच ही स्थापत्य कला आहे. तिथले दृश्य पाहून निसर्गाच्या किमयेचे नि त्यात भर घातलेल्या कृत्रिम कल्पकतेचे कौतुक वाटले. कॅपिलानो सस्पेंशन ब्रिज, ट्रीटॉप्स अँडव्हेंचर आणि रोमांचक नवीन क्लिफवॉक अशा तीन चित्तथरारक सौंदर्याने मन भारावून गेले. […]

कॅनडातील भारत

कॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून गेल्या. परंतु जिथे जाईन तिथे माझं मन कांही तरी शोधीत होतं. नेमक काय हे उमगत नव्हत; परंतु पुढे हळुहळू सारं माझ्या लक्षांत आलं. ते कॅनडातील भारत शोधीत होतं.  मी कॅनडातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी एखाद-दुसऱ्या भारतीय कुटूंबाची हमखास भेट व्हायची. तसा कॅनडा हा संमिश्र संस्कृतीचा देश आहे. नवे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका खंडातील विस्तारने सर्वात मोठा असलेल्या या देशात जगातील विविध देशांच्या लोकांनी येऊन वास्तव्य केले. येथे निर्विवादपणे गोऱ्या… इंग्रजांचे वर्चस्व असले तरी चीनी व भारतीयांची संख्या निश्चितच नगण्य नाही. […]

थ्री सिस्टर्स

सेंट जॉनमध्ये आम्ही रहात असलेल्या इमारतीत, सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे मराठी युवक आता आमचे मित्र बनले होते. एक भाषा, एक देश या नात्याने विदेशातली आमची ओळख घट्ट बनली होती. न कळत आपलेपणा निर्माण झाला होता. आम्ही दिवसभर पर्यटन स्थळाना भेटी देऊन यायचो नि ते ऑफिसची आपली ड्युटी संपवून घरी परतायचे. मग रात्री चर्चेचा तास रंगायचा. कुठे गेलो […]

‘अस्सं माहेर’ सुरेख बाई …..

मागच्‍या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्‍या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्‍या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्‍ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्‍हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्‍ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्‍यावर त्‍यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्‍यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा. […]

अमेरिकन गाठुडं – १०

भारत अमेरिकेची तुलना होऊ शकणार नाही. तो देश दोनशे वर्षा पासून स्वतंत्र आहे, आपण त्यामानाने खूप उशिरा स्वतंत्र झालोय. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत गेलो, तर कोणत्याही प्रगत देशा पेक्षा आपण मागे रहाणार नाही. अन एक दिवस, ‘सारे जहासे अच्छा हिंदूस्ता हमारा!’ आपणच अभिमानाने म्हणू. शेवटी एकच सांगावस वाटत, स्वर्ग काय अन अमेरिका काय? या गोष्टी फक्त पहायच्या असतात, राहायच्या नसतात. शेवटी ‘आपला गाव बरा!’ हेच सत्य असत! […]

अमेरिकन गाठुडं – ९

ऑस्टिन! सकाळी साडेआठची वेळ! पारा पाच अशांवर! आभाळ म्हणजे, राखेडी रंगाचं विशाल घुमट. सूर्याचे अस्तित्व म्हणजे, त्या घुमटातून पाझरलेला, वस्त्रगाळ प्रकाश. पडून गेलेल्या पावसाचे अवशेष परिसरात आणि आसमंतात बिलगून राहिलेले. वातावरणात एक गूढ आणि गोड अशी (‘ती’च्या आठवणींची) कातरता! अधून मधून, गार रेशमी झुळका आसपास लहरून जात होत्या. […]

अमेरिकन गाठुडं – ८

वीक एन्ड आला. एक शॉर्ट ट्रिप करण्याचे ठरले. सॅन अँटोनियो. “किती लांब आहे?” मी विचारले. “काही नाही, तीन साडेतीन तासाच्या ड्राइव्हवर आहे.” मुलगा म्हणाला. या अमेरिकेत प्रवासाचे अंतर मैल किंवा किलोमीटरवर कधीच मोजत नाहीत. किती वेळ लागेल यावर मोजतात! हल्लीची मुलं खूप छान ट्रिप मॅनेज करतात, याचे प्रत्यंतर या वेळेसही आले. मुलाने प्रवासासाठी सात सीटर दांडगी […]

अमेरिकन गाठुडं – ७

ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली. पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लॉट्स मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती. […]

अमेरिकन गाठुडं – ६

मी ऑस्टिनला आल्यापासून तीन मंदिरांना भेट दिली आहे. पैकी ‘ऑस्टिन पब्लिक लायब्ररी’ तुमच्या पर्यंत पोहंचवली आहे. राहिलेले दोन मंदिरांन पैकी एक होते व्यंकटेशाचे मंदिर. […]

1 12 13 14 15 16 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..