नवीन लेखन...

पाऊस सरी पडतांना

पाऊस सरी पडतांना गारवा अंगास झोंबतो, मिठीत तू अलवार घेता घन ओथंबून पाऊस येतो मलमली मिठीत मी येता अश्रूंचा बांध अलगद फुटतो, डोळे हलकेच तू पुसता तो पाऊस मनात मोहरतो किती मनोहर हा नजारा डोळ्यांत निसर्ग खुलतो, हा ओला हिरवा गालिचा थेंब पावसाचा हृदयात मिटतो घन व्याकुळ मी होते चिंब पावसाळी नभात या, कधी भेटशील सख्या […]

पावसाचा थेंब तूं

धुवाधार तो घनमेघ बरसता चिंब भिजविणारा पावसाचा थेंब तूं मनह्रदयीच्या पागोळ्यातुनी अलवार रिमझिमणारा प्रीतस्पर्श तूं ओले ओले मृदगंधले मनांगण मनी दरवळणारा पावसाचा थेंब तूं कोसळणाऱ्या, सरिसरितुनी झरझरणाऱ्या, पावसाचा थेंब तूं प्रीतयुगुलांना, हा ऋतुराज हवासा चिंब बरसणाऱ्या पावसाचा थेंब तूं सृष्टिचे रूपरंग, वादळी सप्तरंगले नभा खुलविणारा पावसाचा थेंब तूं प्रीतभारला, मनामना भावणारा अवीट रेशमस्पर्शी पावसाचा थेंब तूं […]

निघून जाते आयुष्य

निघून जाते आयुष्य खिसे आपुले भरताना वेळ जाते निघून दिवस रात्र धावताना हरवून गेले आहे सारे सुख विकत घेताना क्षणभर हसणे सुद्धा महाग झाले लोकांना विसरलीत नातीगोती सारे जवळ असताना धावपळीचे आयुष्य निमूटपणे जगताना आयुष्य आहे सुरेख कुणीच पाहत नाही नुसती दगदग सुरु वेळ कुणाजवळच नाही बसून मित्रांसोबत आज कुणी बोलत नाही सुखामागे धावताना माणूस आज […]

इथं आपल्याला आवडतं

इथं आपल्याला आवडतं ते लोकांना आवडेल असं नाही, लाईकच गणित कळतं नाही इथं तर कमेंट देणं फार दूरस्थ होई कुणी कुणाला विरोध म्हणून दुसऱ्याला लाईक कमेंट देतात, कुणाचा राग ही न बोलता मग इमोजीत व्यक्त करतात कुणाचे किती कौतुक केले तरी लोकं मागचं आठवतात, एकाला कमी लेखण्यासाठी दुसऱ्याचं वारेमाप कौतुक करतात चांगलं लिहलं तुम्ही तरी इथे […]

मन:शांती

जगायचे अजुनही राहिले किती जगुनही जगती या कळले नाही आठविती सारे क्षण ते भोगलेले आसक्ती, लालसा संपली नाही हव्यास, जीवनी असावा किती याचाच अंदाज बांधता येत नाही समाधानी वृत्ती सदा मनी असावी त्यावीण दुजी जगती सुखदा नाही सुखदुःख, आनंद, दान भाळीचे भोगण्याविण दुसरा पर्याय नाही जे जे लाभले ते ते दान भगवंताचे त्याच्या कृपेविण जीवा सद्गती […]

म्हण ये रे पावसाला

*म्हण येरे पावसाला * जेष्ठा मागून आलास तुझे स्वागत आषाढा म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥धृ॥ पिण्यासाठी नाही पाणी बघ रिता माझा घडा नाही पाणी इथे तिथे पाणी नाही फुलझाडा ॥१॥ आस आता तुझ्या पाशी बरसून जा आषाढा कढ दाटले आशेचे ओल्या झाल्या नेत्रकडा ॥२॥ यक्ष कालिदासाचा तो मेघ दूत त्याचा बडा सांग […]

निवडणूक

१९८५ सालच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केलेली ही कविता ! आजही तितकीच ताजी आणि संदर्भयुक्त आहे – […]

शृंगार वेलीवर एक वेल बहरावी

शृंगार वेलीवर एक वेल बहरावी हलकेच स्पर्शात तुझ्या सांज मोहरावी तप्त ओठांवरी ओठ आल्हाद टेकता चुंबनात न्हाले दोन तन एकांत क्षणा मिठीत अलवार स्पर्श सोहळे सजले साखर चुंबनात ओठ ओठांना भिडले वारा ही तेव्हा अवखळ बावरा होता पदर वाऱ्यावर उडून लाज डोळ्यांत साठता केशर संध्या समयी पाऊल वाटेवर थबकले हात हातात अलगद नजर स्पर्श काही बोलले […]

गुदमरलेला श्वास

आज मी कां कुणां दोष द्यावा भोग माझ्या प्राक्तनाचाच आहे पुण्यही माझे, ते पापही माझे भोगणारा, मीच एकटा आहे वात्सल्य, केवळ जन्मदात्यांचे आशीर्वाद तोच जगवितो आहे ऋणानुबंधी नाती सारी मृगजळी या कलियुगाचा नग्न दृष्टांत आहे प्रीतभावनांचे भास सारे बेगडी जीव स्वार्थी सुखात गुंतला आहे ना लळा, जिव्हाळा, प्रेम माया निर्जीवी भावनांचाच स्पर्श आहे सांगा, जगी आज […]

तो शेवटी पुरुषच असतो

तो शेवटी पुरुषच असतो नवरा हे नावं असतं सगळे नवरे इथून तिथून सारखे तो शेवटी पुरुषच असतो कुठे हो स्त्री किंवा बायको पूर्णपणे स्वतंत्र असते या युगात ही नवऱ्याच्या कलाने स्त्री वागत असते सासर माहेर दोन्ही नाती स्त्रीच जास्त जपत असते पुरुषाला इतकी नाती सांभाळण्यात फिकीर नसते दोन्हीकडे नाती निभावतांना स्त्रीची होते कधी मेटाकुटी नवरा खुशाल […]

1 48 49 50 51 52 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..