विरक्ती
जगलो जगती खुप छान सारे काही मिळाले आहे आतातरी थांबले पाहिजे हे मात्र कळून चुकले आहे देणारा तो एकच मुक्तदाता झोळीच आपुली छोटी आहे किती घ्यावे, किती असावे हेच जगण्याचे खरे मर्म आहे अनंत हस्ते तोच उधळतो आपली ओंजळ अपुरी आहे जे आहे ते सदा देत रहावे मनामनांत रहाणे ब्रह्मानंद आहे ऋणानुबंधी सारा मायाजाल विरक्त जगणे, […]
