फिरते राधा धुंडित मधुवन
( कृष्णजन्माष्टमी व गोपालकाला यानिमित्त) आतुर होउन, शोधित मोहन, फिरते राधा धुंडित मधुवन पडतां कानीं वेणूवादन, भान हरपलें, मोहरलें मन ।। केशकलापीं पुष्पें गंधित धुंद नाचते वेणी मंडित पदिचें नूपुर कटी मेखला करिंचे कंकण करती गायन ।। चंद्रकोर उजळिते ललाटा नथ ऐटीनें चुंबी ओठां हलतें हलकें, हलतां झळके, कानीं झुलणारे आभूषण ।। काजळ खुलवी नयन टपोरे […]
