CKP न्ची दुनियाच गोल

ईकडुन नाते , तिकडुन नाते ,
बर्याच ठीकाणी साटे लोटे|
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !

ताम्हणे,नागले , सुळे ,बेंद्रे,
काही देखणे, काही शेम्बडे |
मुली मात्र सुंदर सुडौल ,
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !

कालची भाची, आजची सुन,
भाचाच आणला जावई म्हणुन |
हलका फुलका घरचा माहौल ,
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !

चिटणीस,फडणिस , हझरनविस,
चांगल्यास चांगले , वाईटास खविस | परखड वृत्ती, तिरकस बोल ,CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !

रविवारी मटण, सोमवारी बिरढे !
कघी निनावे कौतुकाचे !
सोड्याची खिचङी, बोंबलाची भजी ! खाजाचे कानवले, कालवण झिंगय़ाचे ! मेजवानीची खासियत अनमोल !CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !

काश्मिरातूनी उगम पाविले!
दक्षिण देशी रथापित झाले!
बाजीप्रभ् ते अमर जाहले !
गडकरी नाट्यामधूनि स्मरिले !
सी डी देशमुख गौरवस्थानी !
बाळासाहेब महाराष्ट्र अभिमानी !
शौर्याला बुद्धिमत्तेचा तोल!
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !About Guest Author 507 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…