नवीन लेखन...

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य […]

कृपा तुजवरती

कृपा होऊनी शारदेची, कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही, भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।। कुणासी म्हणावे ज्ञानी, रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती, सर्व सामान्य मंडळी ।।२।। कोठे शिकला ज्ञानोबा, तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे, अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।। जिव्हेंवरी शारदा, जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी, कवितेचा जन्म होई….४ भाव शब्दांचा सुगंधी हार, माझी […]

परमोच्य बिंदु

ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय  होऊन जाता सारे परि ते तेव्हांच घडते […]

भीतीपोटी कर्म करता

भीतीपोटी सारे करतां असेच वाटते….।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते त्रिकाळ चाले पूजा अर्चा प्रभूविषयी होई चर्चा बालपणींच पडे संस्कार सारे देण्या समर्थ ईश्वर कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते….१ भीतीपोटी सारे करता, असेच वाटते, चूक असे हे ठसें मनाचे कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे सहभाग नसे यात प्रभूचा सारा खेळ असे तो मनाचा अपयश मिळेल […]

असामान्य व्यक्ती

सामान्यांतूनी असामान्य निर्मिती,  ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती,  चमचमणारे हिरे…..१, उदार होवूनी निसर्ग देतो,  समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला,  सोडूनी जीवन पर्वा……२, जीवन म्हणजे अमूल्य देणगी,  समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३, जीवन कोडे नाहीं उमगले,  कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे,  काढती आपल्या परी….४, निर्जीव सजीव […]

द्रौपदी वस्त्रहरण

ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।। द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।। वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘  धावूनी ये    मी दुःखत पडे मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।। धावूनी आला […]

पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे  । सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।१।। निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे  । कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला, उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  […]

सहज एकदा फेरफटका मारताना

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत  “राग” भेटला मला पाहून म्हणाला… काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? मी म्हणालो अरे नुकताच “संयम” पाळलाय घरात आणि “माया” पण माहेरपणाला आली आहे.. तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!! पुढे बाजारात  “चिडचिड” उभी दिसली गर्दीत, खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात  “अक्कल” नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी […]

1 … 299 300 301 302 303 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..