नवीन लेखन...

तुझ्या विना

माझ्या भावाची बायको, म्हणजे माझी वहिनी, हीच्या हाताचे हाड मोडले आणि plaster मध्ये आहे हात. त्या वर माझ्या भावाने एक कविता बनवली आहे. वाचनीय आहे […]

लोभस चांदणे

चंद्र आज एकला नभी उगवला  । रात पुनवेची मधूर भासला  ।। मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला  । शितल वारा अंगी झोंबू लागला  ।।   उलटून गेली रात्र मध्यावरती  । लुक लुकणारे तारे आतां दिसती  ।। पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती  । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती  ।।   त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे  । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा […]

विसरण्यातील आनंद

विसरण्यातच लपला आहे,  आनंद जीवनाचा आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा…१   दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी….२   वस्तूच्या त्या होवूनी आठवणी,  सुख देई आम्हांला क्षणिक असती सारे सुख,  दु:ख उभे पाठीला…३   उपाय त्यावरी एकची आहे,  विसरून जाणे आठवणी विसरूनी जातां त्या सुखाला,  दु:खी होई […]

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे,   कौशल्य सारे एकवटूनी वृक्षाच्या उंच फांदिवरी,  लोंबत होते झोके घेवूनी…१,   दूर जावूनी चारा आणिते,   पक्षीण आपल्या पिल्याकरिता जग सारे ते घरटे असूनी,  स्वप्न तिचे त्यांत राहता…२,   वादळ सुटले एके दिनी,   उन्मळून पडला तो वृक्ष पिल्लासाठी ती गेली होती,   शोधण्यासाठी आपले भक्ष्य…३   शाबूत घरटे फांदी वरते,  वृक्ष जरी तो पडला […]

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे….१ तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली….२ जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला….३ माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती….४ मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे […]

कवीची श्रीमंती

खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार  । शिकला  सवरला परि    न जाणला संसार  ।। पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी  । घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी  ।। वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता  । कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता  ।। सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची  । श्रेष्ठ पदीचा […]

दृष्टांताची किमया

निराकार तो असूनी व्यापतो, सर्व विश्व मंडळ, सूक्ष्मपणातही दिसून येतो, करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।   दर्शन देण्यास भक्त जणांना, धारण करितो रूप, तसाच दिसे नयनी तुमच्या, ध्यास लागता खूप ।।२।।   दृष्टांत होणे सत्य घटना ती, जीवनी तुमच्या घडे, वेड लागता प्रभू चरणाचे, सदैव स्वप्न पडे ।।३।।   कुणामध्येही अस्तित्व दाखवी, हीच त्याची किमया, परि टिपून […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच   सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई   माझ्यातील   ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘  आहे, जाण येई कशी मग   जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता  ‘अहं  ब्रह्मास्मि‘   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

1 … 298 299 300 301 302 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..