नवीन लेखन...

दुर्बल काटा

रस्त्यावरुन चालताना रुतले पायात माझ्या काटे कितीक चालत होतो अनवाणी मी त्यात काट्यांचा काय दोष । दोष होता माझा खरा अनवाणी मीच चाललो दोष काट्याच्या मारुन माथी चूक माझीच मी लपवितो । येथे दुबळ्यांचे जगणे असेच नियम आहे या जगाचा तुडऊन जातील ते तुम्हास बघतील फक्त स्वार्थ स्वताचा । होऊ नका दुबळे तुम्ही कधी झुकू नका […]

कर्तृत्वाला काळ न लागे

सुचले होते सारे कांहीं परि,  ढळत्या आयुष्यीं संधिप्रकाश तो दिसत होता,  सूर्य अस्ताशीं…१, काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे…२, समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे…३, ज्ञानविषय अथांग होते,  अवती भवती कसा पोहू ह्या ज्ञान सागरीं,  विवंचना होती…४, निराश होऊं नकोस वेड्या,  कर्तृत्वाला काळ न […]

तेजस्वी काजवा

आभाळ दाटून आले चहूकडे अंधार झाला तोडण्यास लचके कुणाचे लांडगा सिंह झाला फुंकली हवा शिडात विषारी जातीयतेची भिडवतात धर्मांधांना भरण्या तुंबडी स्वतःची। भासवती निधर्मी स्वताला येथे तुम्हा आम्हास ऊचलता तळी ऊपऱ्यांची यांचा जातो जन्म लयास बहुसंख्य जातोय बळी ना अंत लांगुलचालनास भावना पायदळी तुडवतात ना खंत कधी कुणास । टपलेत मदारी येथे रोज दाखवती नवीन खेळ […]

गत आठवणी

सोडूनी मज गेलीस तू आता मी कसे जगावे वाटते तव आठवणीत जीवन हे संपवावे । एक एक क्षण प्रेमाचा का आठवणीत रहावा ह्रदयातील त्या आठवणींना अश्रुंत संपवावे । ठेवले जपून ह्रदयात मी त्या मधूर क्षणांना का त्या मधूर क्षणांना पुन्हा पुन्हा मी आठवावे । आसमंत चांदण्यांनी झगमगून गेलाय येथे एका चांदणीसाठी मग मी का रुसून बसावे […]

एकांत

विझवून दीप सारे ये प्रिये माझ्या कुशीत वाट तुझी पाहतो मी पाहू नकोस आता अंत । झोपली गाय गोठ्यात झोपे वासरु पुढ्यात समई देवापुढील ही झालीय आता शांत । विरह अपुला संपण्याची जवळ आली घडी किती दिसानी सखे ग आज मिळे एकांत । नेसून ये भरजरी शालू माळून केसात गजरा नसे ठाऊक पुन्हा कधी लाभेल असा […]

रात्र मिलनाची

मला वाटते आज नव्याने जगावे तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी मिठीत तुझ्यासवे विसावून जावी । पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी । विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता ना कुठल्याही […]

तुला लाभलेली निसर्ग देणगी

खळी पडून गालावरी   सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी    मधूर तूं हांसते इवले इवले ओठ      फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे   भुर भुर उडती मानेवरी मोत्यासारखे दांत भासे   कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे   तुझ्या डोळ्या इंद्रधनुष्याचा बाक      दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली   नाकाला चमकते अंगकांती    फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी   तुझ्या गरीबीतूनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar”Gmail.com

नाते

तुझे नी माझे कसले नाते अजून मला ते कळले नाही एकदा तरी तुज पाहिल्यावीना मजला काही करमत नाही । ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो । आता तरी तू सांग मजला काय आहे आपुले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते । सुरेश काळे […]

देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी,  सुंदर वसले शहर एक  । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी,  कार्ये चालती तेथे अनेक  ।। सुसंगता शिस्तबद्ध   साह्य करिती एकमेकांना  । शत्रूची चाहूल येतां,  परतूनी लाविती त्या घटना  ।। अप्रतिम  शहर असूनी,  नाव तयाचे असे  ‘पुरूष’  । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी,  मालक त्याचा आहे ‘ईश  ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी  […]

संगीत सुर्य

गदीमा आणी बाबुजींनंतर रामायणातील गीत संपले भावमधुर त्या भावगीतातील भावनांचे अस्तित्व संपले । बाबुजीं नंतर पुन्हा एकदा भावगीत ते स्तब्ध जाहले देण्या संगीत स्वर्गलोकी संगीतसुर्य यशवंत निघाले । संवादिनी ती तानपुऱ्यासह आज अश्रु ढाळीत आहे ताल हरवलाय आज तबल्याचा विणा सरस्वतीची अबोल आहे । भाव मराठी भावगीतातील आज गेले आहेत हरवूनी गायकांच्या मधूर गळ्यातील सूरही आज […]

1 245 246 247 248 249 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..